सतत एकाच जागी बसून कंबर दुखणं, पाठ दुखणं असा त्रास अनेकांना उद्भवतो. यावर उपाय म्हणून वारंवार पेनकिलर घेणं हा योग्य उपाय नाही. फुटाणे, डिंक, पांढरी मुसळी यांपासून तयार केले जाणारे लाडू एक स्वादीष्ट आणि पौष्टीक मिठाई आहे. भारतातील बऱ्याच भागातील पारंपारीक पदार्थांपैकी हे लाडू आहेत. (Healthy Laddu Recipe) हे लाडू बनवण्यासाठी फुटाणे, डिंक, ड्रायफ्रुट्सचा वापर केला जातो. या तिन्ही गोष्टी एकत्र करून तुम्ही लाडू बनवू शकता. याची चव उत्तम लागते आणि चवीलाही चांगले असतात. (Super Health Benefits Of Roasted Chana Laddu For Strong Bones)
माय हेल्दी ट्रिट. ईनच्या रिपोर्टनुसार फुटाणे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते, हाडांना बळकटी मिळते याशिवाय रक्तदाबाच्या समस्याही उद्भवत नाहीत. हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठीही रोजच्या आहारात चण्यांचा समावेश करावा. प्रोटीन्सुयुक्त पदार्थांमध्ये फुटाणे ने सगळ्यात वरच्या क्रमांकावर आहेत. कारण यातून पुरेपूर पोषण मिळते. (Amazing Health Benefits of Roasted Chana Ladoo)
चण्याचे पौष्टीक लाडू करण्याची कृती (Chana Ladoo Making Process)
1) भाजलेले चणे- १ कप
२) डिंग- अर्धा कप
३) पांढरी म्यूसली- अर्धा कप
४) साखर- १ कप
५) तूप- १ कप
६) वेलची- अर्धा टिस्पून
भाजलेल्या चण्याचे लाडू करण्याची योग्य पद्धत (How to make Healthy Roasted Chana Laddu)
१) सगळ्यात आधी चणे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्या. त्यात डिंक पाण्यात घालून २ ते ३ तासांसाठी तसंच ठेवून द्या. २ ते ३ तासांनी डिंक पाण्यातून काढून व्यवस्थित धुवून घ्या. नंतर मुसळी पाणी भिजवून २ ते ३ तासांसाठी तशीच ठेवून द्या. त्यानंतर पाण्यातून काढून धुवून घ्या.
पोट खूप सुटलंय-धड व्यायामही होत नाही? रोज रिकाम्या पोटी हा पदार्थ घ्या-पोट होईल स्लिम
२) एका कढईत तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप वितळल्यानंतर त्यात डिंक घालून भाजून घ्या. डिंक तुपात भाजून घेतल्यानंतर त्यात मुसळी घालून भाजून घ्या. डिंक आणि पांढरी मूसळी भाजल्यानंतर त्यात चणे घालून पुन्हा भाजून घ्या. चण्याची डाळ,चणे भाजल्यानंतर त्यात साखर घालून पुन्हा एकजीव करा.
थंडीत चेहरा काळवंडला-त्वचा ताणल्यासारखी झाली? मुल्तानी मातीचा १ उपाय, सॉफ्ट-ग्लोईंग दिसेल त्वचा
३) साखर वितळल्यानंतर त्यात वेलची पावडर घालून व्यवस्थित मिसळा नंतर हे मिश्रण घट्ट होईपर्यंत भाजून घ्या. मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा. मिश्रण थोडावेळासाठी थंड होऊ द्या. हे मिश्रण हलकं थंड झाल्यानंतर त्याचे लाडू वळून घ्या. तयार आहे चण्याचे पौष्टीक लाडू. हे लाडू करताना तुम्ही आवडीचे ड्रायफ्रुट्स यात घालू शकता.
भाजलेले चणे खाण्याचे फायदे (Benefits Of Roasted Chana In Marathi)
१) भाजलेले चणे, डिंक आणि पांढऱ्या मुसळीचे लाडू चवीला फारच उत्तम असतात. या लाडूत प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्, फायबर्स आणि इतर पोषक तत्व असतात.
२) भाजलेले चणे प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत आहेत. एक काप भाजलेल्या चण्यांमध्ये जवळपास १५ ग्राम प्रोटीन्स असतात.
३) प्रोटीन्स मांसपेशींच्या विकासासाठी फायदेशीर ठरते. कार्बोहायड्रेट्सचाही चांगला स्त्रोत आहेत.
४) एक कप भाजलेल्या चण्यांमध्ये जवळपास ५० ग्राम कार्बोहायड्रेट्स असतात. कार्बोहायड्रेट्स शरीराला उर्जा देण्यास मदत करतात.
५) चणे आणि गूळ खाल्ल्याने अशक्तपणा, थकवा दूर होतो.