Join us   

घातक बॅड कोलेस्टेरॉल वाढलं, पाठही दुखते? 'या' पोझिशनमध्ये बसा, पोटही होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 2:50 PM

Benefits Of Sitting In Right Position (Mandi Ghalun Basnyache Fayde) : मांडी घालून बसल्याने मेटाबॉलिझ्म वाढतो आणि फॅट्स लवकर बर्न होण्यासही मदत होते.

हजारो वर्षांपासून भारतात जमिनीवर बसून जेवणाची प्रथा प्रचलित आहे. जमिनीवर मांडी घालून बसल्याने शरीराची पोश्चर व्यवस्थित राहते आणि कोलेस्टेरॉलसारख्या समस्या उद्भवत नाहीत.  आजकाल वेदना, मांसपेशी असंतुलनाची समस्या वाढली आहे. ज्यामुळे शरीराचं पोश्चर बिघडतं. लोकांनी बसण्याची पद्धत बदलायला हवी. आधीच्या जमान्यात लोक खाली बसून जेवायचे ज्यामुळे पोश्चर सुधारण्यात आणि आजारांपासून लांब राहण्यास मदत व्हायची. (Benefits Of Sitting In Right Position Or Sukhasan For High Cholesterol)

मांडी घालून बसण्याची पद्धत एका योगासनाप्रमाणे आहे. ज्याला सुखासन असे म्हणतात. ज्यामुळे पाय क्रॉस करून बसता येतं.  घाणेरडं कोलेस्टेरॉल निघून जाण्यासही मदत होते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑर्थेपेडिक सायंसमध्ये छापलेल्या शोधात सुखासनाचा प्रभाव दिसून आला आहे.

जया किशोरींनी कसं केलं वेट लॉस ट्रांस्फॉर्मेशन; 'हा' पदार्थ खाणं सोडलं, पाहा साधं पौष्टिक डाएट

यानुसार सुखासनात मेडीटेशन केल्याने कोलेस्टेरॉल लेव्हल कंट्रोल करण्यास मदत होते.  या पोश्चरमध्ये बसल्याने कार्डीओ मेटाबॉलिक फंक्शन सुधारते. हे एक ब्लड प्रेशर मॅनेज करण्यास मदत करते. ज्यामुळे हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत होते. 

मांडी घालून बसल्याने मेटाबॉलिझ्म वाढतो आणि फॅट्स लवकर बर्न होण्यासही मदत होते. याशिवाय लठ्ठपणाचा धोका टळतो. टेंशन आणि स्ट्रेस यांसारखे मेंटल प्रोब्लेम्स दूर करण्यासाठी तुम्ही सुखासनात बसून डीप ब्रिदींग करू शकता. ज्यामुळे मेंदूची ऑक्सिजन लेव्हल चांगली होईल ज्यामुळे ब्रेन फंक्शन सुधारण्यासही मदत होईल.

पोट लटकतंय, मांड्यांचा आकार वाढला? किचनमधले २ पदार्थ पाण्यात घालून घ्या-भराभर कमी होईल वजन

सुखासनामुळे कंबरदुखीच्या वेदना उद्भवत नाहीत. पाठ किंवा कंबरेच्या मसल्सना सपोर्ट मिळतो. ब्लड सर्क्युलेशन चांगले होते. ज्यामुळे मसल्सना पूर्ण पोषण मिळते. जमीनिवर बसल्याने मन पॉझिटिव्ह राहते. याशिवाय  हृदय आणि मेंदूतील निगेटिव्हीटी निघून जाते.

प्रत्येक दिवशी १० ते १५ मिनिटं जमिनीवर बसल्याने एनर्जी लेव्हल वाढते. जमिनीवर बसल्याने आणि उठल्याने शरीराला भरपूर फायदे मिळतात. ज्यामुळे मांसपेशी चांगल्या राहतात. रोज जमिनीवर बसणं ही एक प्रकारची एक्सरसाईज आहे जी नियमीत केल्याने  शरीर फ्लेक्लिबल राहण्यास मदत होते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइलफिटनेस टिप्स