संध्याकाळच्या नाश्त्याचा पदार्थ किंवा काहीतरी चटपटीत स्नॅक्स म्हणून सगळ्यांनाच पाणीपुरी आवडते. देशात पाणीपुरीला विविध राज्यात विविध नावांनी ओळखलं जातं. पुचका, गुपचूप, पानी के बताशे, गोलगप्पा अशी अनेक नावं आहेत. हे भारतातील सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. वर्षानुवर्षे त्याची लोकप्रियता अधिक वाढली आहे. परदेशी लोकांनाही हा अद्भुत पदार्थ आवडतो. वेगवेगळ्या भारतीय राज्यांमध्ये पाणीपुरी वेगवेगळ्या पद्धतीनं बनवली जाते.
काही दिवसांपूर्वी भाला फेकण्याच्या ऑलिम्पिक स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्रानं पाणीपुरीचे उत्तम खाद्य म्हणून वर्णन केले आणि म्हणाला, एकदा पाणीपुरी खाल्ल्यानं कोणत्याही खेळाडूच्या शरीराचं नुकसान होत नाही. आता तुम्हाला समजले असेल की पाणीपुरी कधीतरी खाणं वजन कमी करण्याच्या मार्गात अडथळा आणत नाही.
नीरज चोप्राने पाणीपुरीचे कौतुक करण्यामागे अनेक कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पाणी पुरीने तुमचे पोट भरते. पुरी खूप हलकी आहे आणि पिठापासून बनवली जाते. पाणीपुरी मध्ये सुद्धा खूप कमी मसाला आहे, त्यामुळे ते खाण्यात काही नुकसान नाही.
पाणीपुरी खाण्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात?
१) नोएडा येथील कोलकाता होमिओपॅथी सेंटर (बीएचएमएस) च्या डॉक्टर मीनाक्षी शर्मा यांनी सांगितले की, पाणीपुरी खाणं आरोग्यासाठी चांगले आहे. त्यात वापरले जाणारे पदार्थ पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या पोषक घटकांमुळे समृद्ध आहेत, जे तोंडात आढळणारे अनावश्यक जीवाणू नष्ट करण्यात मदत करतात. डॉक्टर असेही म्हणतात की पाणीपुरी पचनासाठी चांगली आहे.
२) हा नाश्ता केवळ चवीला भन्नाट नाही. तर तो आपल्या आरोग्यासाठी आश्चर्यकारक फायदे देणारा आहे. कारण हे आपल्याला शक्य तितक्या सोप्या मार्गाने आवश्यक पोषक तत्त्वे प्रदान करते.
३) हा घटक तुमच्या रक्ताला ऑक्सिजनयुक्त ठेवण्यास मदत करतो. ते तुमच्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. यासह, पाणीपूरीमधून मॅग्नेशियम, फॉस्फरस, मॅंगनीज, पोटॅशियम, फोलेट, जस्त आणि जीवनसत्त्वे ए, बी -6, बी -12, सी आणि डी मिळतात.
४) डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर
रक्तातील साखरेची वाढलेली पातळी ही जगभरात एक सामान्य समस्या बनली आहे. असे बरेच लोक आहेत जे मधुमेहामुळे ग्रस्त आहेत, ज्यांच्यासाठी कोणताही उपचार नाहीत. म्हणून, आपण गोड पदार्थ आणि उच्च-कॅलरीयुक्त पदार्थ देखील टाळावेत. पाणीपुरी हे कमी कॅलरी असलेले जेवण आहे ज्यात गोड चटणी हा एक पर्याय आहे. मधुमेहाचा रुग्ण कोणत्याही चिंता न करता या नाश्त्याचा पूर्णपणे आनंद घेऊ शकतो. तथापि, आपण किती प्रमाणात खात आहात याची जाणीव ठेवणे ही मुख्य गोष्ट आहे!
५) एसिडिटीची समस्या कमी होते
जेवण वेळेवर न करणे, जास्त खाणे, मध्यरात्री स्नॅक्स खाणे, जाड होणे, ही एसिडिटी होण्याची सामान्य कारणे आहेत. पाणीपुरी आपल्याला या परिस्थितीत मदत करू शकते, कारण जलजीराच्या पाण्यात इतर अनेक घटक असू शकतात जे एसिडीटीवर कार्य करू शकतात आणि त्रासापासून बरं वाटण्यास मदत करतात. यात पुदीना, कच्चा आंबा, काळे मीठ, काळी मिरी, किसलेले जिरे आणि सामान्य मीठ यांचा समावेश आहे.
६) मूड चांगला राहतो
उन्हाळा असो की हिवाळा, मसालेदार पाणीपुरीसह शेवची थाळी नेहमी तुमचा मूड चांगला बनवण्यास मदत करू शकते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणीपुरी जास्त प्रमाणात खाल्ली जाते. कारण त्या काळात तुम्हाला डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. पाणीपुरीच्या पाण्याने तुम्हाला थोडे उत्साही आणि ताजेतवाने वाटते.