Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोटाची चरबी कमीच होत नाही? हे ५ फूड कॉम्बिनेशन्स ट्राय करा, भराभर कमी होईल फॅट

पोटाची चरबी कमीच होत नाही? हे ५ फूड कॉम्बिनेशन्स ट्राय करा, भराभर कमी होईल फॅट

Best 5 Foods Combination For Weight Loss : अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की क्रॅश डाएटवर गेल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळत नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 12:27 PM2024-11-25T12:27:01+5:302024-11-25T12:34:53+5:30

Best 5 Foods Combination For Weight Loss : अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की क्रॅश डाएटवर गेल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळत नाहीत.

Best 5 Foods Combination For Weight Loss Help Boost Metabolism And Over | पोटाची चरबी कमीच होत नाही? हे ५ फूड कॉम्बिनेशन्स ट्राय करा, भराभर कमी होईल फॅट

पोटाची चरबी कमीच होत नाही? हे ५ फूड कॉम्बिनेशन्स ट्राय करा, भराभर कमी होईल फॅट

हेल्दी डाएट घेतल्यानं आणि एक्टिव्ह राहिल्यानं आपण फिट एण्ड फाईन राहतो. पण हेल्दी पदार्थांचे सेवन करून तुम्ही आजारांचा धोका टाळू शकता. याशिवाय वजन वाढण्याचा धोकाही टाळता येतो. वजन कमी करण्यासाठी वर्कआऊट बरोबरच चांगलं  डाएट घेणंही तितकंच महत्वाचं आहे. अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की क्रॅश डाएटवर गेल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळत नाहीत. काही सोपे उपाय करून तुम्ही सहज वजन कमी करू शकता. (Best 5 Foods Combination For Weight Loss Help Boost Metabolism And Over)

डॉ. निधी धवन यांच्यामते नियमित हेल्दी डाएट, व्यायाम आणि योग्य आहारात फॉलो केल्यास वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होईल. याशिवाय वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत चांगले परिणाम मिळतील. तुम्ही तुमची वेट लॉस जर्नी वेगानं वाढवण्यासाठी काही वेगळे फूड कॉम्बिनेशन्स ट्राय करू शकता. 

ग्रीन टी आणि लिंबू

ग्रीन टी एक चमत्कारीक पेय आहे. ज्यामुळे  वजन कमी होण्यास आणि पोटाची चरबी जाळण्यास मदत होते. ग्रीन टी मध्ये ईसीजीसी एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे फॅट्स कमी होतात. ग्रीन टी मध्ये मोठ्या प्रमाणात कॅचेटिन  नावाचे एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे लिव्हर फॅट एनर्जीमध्ये बदलण्यास होते.  फॅट सेल्स बाहेर निघण्यास मदत करतात. ग्रीन टी मध्ये पॉलिफेनॉल्स आणि पेक्टिन असते ज्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि वजन कमी होण्यासही मदत होते. ग्रीन टी मध्ये लिंबाचा रस मिसळून तुम्ही अधिक टेस्टी बनवू शकता.

नारळाचं तेल आणि कॉफी

नारळाच्या तेलात ट्रायग्लिसराईड मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे एनर्जी लेव्हल वाढून मेटाबॉलिझ्म वेगानं होण्यास मदत होते. ज्यामुळे भूकही नियंत्रणात राहते. याशिवाय फॅट बर्न होण्यास मदत होते. यातील कॅफेन मेटाबॉलिझ्मचा वेग वाढवते आणि कॅलरीज बर्न होण्यासही मदत होते. 

केळी आणि पिनट बटर

जेवणाबरोबर एका कार्ब आणि प्रोटीन गरजेचे असते. हेल्दी कॉम्पलेक्स काब्स आणि लिन प्रोटीन सोर्समुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहण्यास मदत होते. प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स दोन्ही शरीरातील  बल्ड शुगर लेव्हल वाढण्यापासून रोखतात. केळी खाल्ल्यानं तुम्हाला कार्बोहायड्रेट्स मिळते तर पिनट बटर तुम्हाला प्रोटीन आणि फॅट्स देतात.

एवोकॅडो आणि पालेभाज्या

एवोकॅडो आणि पालेभाज्या तुम्ही सॅलेड्सच्या स्वरूपात खाऊ शकता. पोषक तत्वांनी परिपूर्ण या २ पदार्थांमध्ये कॅलरीज कमीत कमी प्रमाणात असतात. हे कॉम्बिनेशन खाल्ल्यानं तुम्हाला भूक कमी लागेल आणि पोट भरलेलं राहील. हेल्दी फॅट्समध्ये मोनोसॅच्युरेडेट फॅट्स असतात ज्यामुळे भूक कमी होते. एवोकॅडो भाज्यांमधील एंटी ऑक्सिडेंट्स एब्जॉर्ब करण्यास मदत करतात जे आजारांशी लढतात.
 

Web Title: Best 5 Foods Combination For Weight Loss Help Boost Metabolism And Over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.