Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > गुडघे, सांधे फारच दुखतात? 4 आयुर्वेदीक तेलांनी मालिश करा, कायमच्या वेदना होतील दूर

गुडघे, सांधे फारच दुखतात? 4 आयुर्वेदीक तेलांनी मालिश करा, कायमच्या वेदना होतील दूर

Best ayurvedic oil for joint and muscle pain : सतत  एकचजागी बसून राहणं, चुकीचं खाणं पिणं, वातावरणातील बदल यामुळे समस्या वाढू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 12:11 PM2023-02-19T12:11:00+5:302023-02-19T13:07:51+5:30

Best ayurvedic oil for joint and muscle pain : सतत  एकचजागी बसून राहणं, चुकीचं खाणं पिणं, वातावरणातील बदल यामुळे समस्या वाढू शकतात.

Best ayurvedic oil for joint and muscle pain : Which oil is best for joint and muscle pain? | गुडघे, सांधे फारच दुखतात? 4 आयुर्वेदीक तेलांनी मालिश करा, कायमच्या वेदना होतील दूर

गुडघे, सांधे फारच दुखतात? 4 आयुर्वेदीक तेलांनी मालिश करा, कायमच्या वेदना होतील दूर

वातावरणातील बदलांबरोबरच आजारांचा धोकाही वाढतो. यात सगळ्यात जास्त सांधे आणि गुडघ्याची समस्या जास्त प्रमाणात जाणवते, आता हिवाळा संपून उन्हाळा सुरू होणार आहे. अशावेळी अनेकांना मांसपेशी आणि सांधेदुखीचा सामना करावा लागतो. मांसपेशींतील वेदना छाती, पोट, पाठ आणि हातांवर जाणवतात, आराम करणं, फिजियोथेरेपी, वेदनाशामक औषध या उपायांनी काहीवेळा आराम जाणवत नाही. (5 Best Ayurvedic Oils for Joint Pain)

या वेदना काही दिवसांत बऱ्या होतात पण काहीवेळा पूर्ण बरं होण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिकचे डायरेक्टर डॉक्टर कपिल एका हिंदी वेबसाईटशी बोलताना काही आयुर्वेदीक उपाय सांगितले आहेत. मासपेशींच्या वेदना सामान्य आहेत फक्त वयस्कर लोकच नाही तर लहान मुलं आणि तरूणांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. सतत  एकचजागी बसून राहणं, चुकीचं खाणं पिणं, वातावरणातील बदल यामुळे समस्या वाढू शकतात. जॉईंट आणि मसल्सपेन दूर करण्यासाठी आयुर्वेदात तेलांचा वापर केला जातो जे फारच परिणामकारक ठरतात. 

तिळाचं तेल

डॉक्टरांच्यामते तिळाचं तेल हा तुमच्यासाठी स्वस्त आणि प्रभावी उपचार ठरू शकतो.  यासाठी तिळाचं तेल ६ ते १२ ग्राम घेऊन गरम करून घ्या आणि थंड करायला ठेवा. दिवसातून दोनवेळा हे तेल लावल्यानंतर फरक जाणवेल.  रात्री झोपतानाही गुडघ्याच्या दुघण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही हे तेल वापरू शकता. 

नारायण तेल

नारायण तेल जॉईट्स एंड मसल्स पेनसाठी  रामबाण उपाय आहे. जर तुम्हाला स्वस्तात वेदनांपासून आराम मिळवायचा असेल तर नारायण तेल कोमट करून प्रभावित भागांवर लावा आणि यामुळे तुम्हाला त्वरीत आराम मिळेल. 

एरंडीचं तेल

एरंडीचे तेल आयुर्वेदात एक उत्तम औषध मानले जाते. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी १४ मिली लिटर एरंडीच्या तेलात एक ग्राम लहान पिंपळी घालून मंद आचेवर शिजवून घ्या हे मिश्रण रात्री झोपताना वेदना होत असलेल्या ठिकाणी लावा.

नारळाचं तेल

नारळाच्या तेलाचे अनेक फायदे आहेत. आयुर्वेदात हे तेल औषधी मानले जाते.  साधेदुखी आणि मासंपेशीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी हलकं गरम करून घ्या आणि थोडं कपूर आणि सुंठ घाला.  या तेलानं गुडघ्यांवर मालिश करा जेणेकरून त्वरीत आराम मिळेल.

Web Title: Best ayurvedic oil for joint and muscle pain : Which oil is best for joint and muscle pain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.