Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पावसाळी हवेमुळे गुडघे, कंबर कुरकुरायला लागले? बघा सांधेदुखी कमी करणारा १ आयुर्वेदिक उपाय

पावसाळी हवेमुळे गुडघे, कंबर कुरकुरायला लागले? बघा सांधेदुखी कमी करणारा १ आयुर्वेदिक उपाय

Ayurvedic Remedies For Body Aches And Joint Pain: पावसाळी थंड, दमट हवेमुळे (rainy days) अंगदुखी, सांधेदुखी असा त्रास होण्यास सुरुवात झाली असेल तर लगेच हा एक सोपा उपाय करून पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2024 09:34 AM2024-07-02T09:34:24+5:302024-07-02T09:35:34+5:30

Ayurvedic Remedies For Body Aches And Joint Pain: पावसाळी थंड, दमट हवेमुळे (rainy days) अंगदुखी, सांधेदुखी असा त्रास होण्यास सुरुवात झाली असेल तर लगेच हा एक सोपा उपाय करून पाहा...

Best ayurvedic Remedies for Body Aches and joint pain in monsoon, how to reduce joint pain and body aches in rainy days | पावसाळी हवेमुळे गुडघे, कंबर कुरकुरायला लागले? बघा सांधेदुखी कमी करणारा १ आयुर्वेदिक उपाय

पावसाळी हवेमुळे गुडघे, कंबर कुरकुरायला लागले? बघा सांधेदुखी कमी करणारा १ आयुर्वेदिक उपाय

Highlightsया दिवसांत शरीरात वायुंचे असंतुलन झाल्याने बऱ्याच जणांना सांधेदुखी, अंगदुखीचा त्रास होतो. म्हणूनच वायू संतुलित करून हा त्रास कमी करण्याचा एक सोपा उपाय...

सध्या सगळीकडे छान पावसाळी वातावरण निर्माण झालेलं आहे. रणरणत्या उन्हानंतर वातावरणात आलेला हा गारवा हवाहवासा वाटतो आहे. पण पावसाळा जसा सुखद, आल्हाददायक असतो, तसाच तो अनेक दुखणी घेऊन येणाराही ठरताे. कारण पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण तर वाढतेच पण या दिवसातल्या थंड, दमट वातावरणामुळे अनेकांना सांधेुदखी, अंगदुखी असा त्रास होतो. हल्ली तर हा त्रास फक्त वयस्कर लोकांनाच होतो, असेही नाही. ऐन तिशीतले तरुणही हाडं कुरकुरायला लागले आहेत, अंग ठणकतंय अशी तक्रार करतात (Best ayurvedic Remedies for Body Aches and joint pain in monsoon). तुम्हाला किंवा तुमच्या घरातल्या इतर मंडळींनाही असाच त्रास सुरू झाला असेल तर लगेच आयुर्वेदतज्ज्ञांनी सांगितलेला १ सोपा घरगुती उपाय करून पाहा. (how to reduce joint pain and body aches in rainy days)

 

सांधेदुखी, अंगदुखीचा त्रास कमी करण्यासाठी उपाय

पावसाळी हवेमुळे अंगदुखीचा त्रास होत असेल तर काय उपाय करावा याविषयीचा एक व्हिडिओ आयुर्वेदतज्ज्ञांनी chitchatrajlavi या इन्स्टाग्राम पेजवर सांगितला आहे. यामध्ये त्यांनी एकूण २ अगदी सोपे आणि सगळ्यांनाच सहज करता येतील असे उपाय सांगितले आहेत.

रस्त्यावरची पाणीपुरी खाणं पडेल महागात, FSSAI चा अभ्यास सांगतो- पाणीपुरीमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दिवसांत शरीरात वायुंचे असंतुलन झाल्याने बऱ्याच जणांना सांधेदुखी, अंगदुखीचा त्रास होतो. म्हणूनच वायू संतुलित करून हा त्रास कमी करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे दररोज सकाळी आणि संध्याकाळी सूंठ टाकून काढा घेणे.

कडधान्यांची उसळ नेहमीचीच, आता त्याचे टम्म फुगणारे जाळीदार आप्पे करून पाहा, घ्या सोपी रेसिपी 

हा चहा करण्यासाठी एका पातेल्यात १ कप पाणी घ्या. त्यामध्ये थोडी सूंठ पावडर टाका. आणि हे मिश्रण ५ ते ७ मिनिटे मंद ते मध्यम आचेवर उकळून घ्या. त्यानंतर हा चहा गरमागरम प्या. या काढ्याला किंवा चहाला चव येण्यासाठी तुम्ही त्यात थोडासा गूळ देखील टाकू शकता.

 

दुसरा उपाय म्हणजे एरंडेल तेलाने जिथे वेदना आहेत, त्या भागाला मालिश करणे. यासाठी तेल थोडं कोमट करून घ्या.

९० टक्के लोक 'इथे' चुकतात, म्हणूनच तर केस गळून पातळ होतात, बघा तुम्हीही तेच करता का?

तेलाने मालिश केल्यामुळे वेदना कमी होतील, त्या भागावरची सूज उतरेल आणि व्यवस्थित लुब्रिकेशन मिळाल्याने हाडांचे घर्षण होणार नाही. त्यामुळे चालताना किंवा उठता- बसता वेदना होणार नाहीत. 

 

Web Title: Best ayurvedic Remedies for Body Aches and joint pain in monsoon, how to reduce joint pain and body aches in rainy days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.