किडनी हा शरीरातील महत्वपूर्ण अवयवांपैकी एक असून शरीरातील घाणेरडे पदार्थ गाळण्याचे काम याद्वारे केले जाते. याव्यतिरिक्त खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि काही आजारांमुळे किडनी डॅमेज होते. (Best Cooking Oil) म्हणूनच किडनीच्या रुग्णांनी आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. किडनीच्या आरोग्याला चांगल ठेवण्यासाठी कोणतं तेल योग्य ठरतं ते पाहूया. (5 cooking oil is good for kidney health according to nutritionist)
पोषणतज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी एनबीटी या वेब पोर्टलशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तेल तब्येतीसाठी चांगले असते. कारण शरीराला आवश्यक असलेले फॅट्स त्यात असतात. जास्त फॅट्सयुक्त पदार्थांमुळे कोलेस्टेरॉल, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर वाढतं. यामुळे फक्त हार्ट नाही तर किडनीसुद्धा कमकुवत होते.
1) किडनीशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्यांना फ्लेक्ससीड तेलाचे सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. किडनीचे कार्य सुधारण्यासाठी फ्लेक्ससीड तेल प्रभावी असल्याचे अनेक अभ्यासांमध्ये आढळून आले आहे.
2) तांदळाच्या कोंड्याच्या तेलामध्ये असे पदार्थ असतात जे शरीराद्वारे शोषले जाणारे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करू शकतात. तांदळाचा कोंडा कॅल्शियमचे शोषण देखील कमी करतो, ज्यामुळे किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध होतो.
3) व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल मोनोअनसॅच्युरेटेड फॅटमध्ये समृद्ध आहे, जे कोलेस्टेरॉलची पातळी सुधारू शकते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. यासोबतच हे किडनीला आजारांपासून वाचवते.
केस खूपच पातळ झाले? भातापासून बनलेला 'हा' स्प्रे रोज केसांवर मारा; लांब, दाट होतील केस
4) बदामाच्या तेलामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट असते, जे लठ्ठपणा आणि रक्तातील साखर वाढण्यापासून रोखण्याचे काम करते. कारण जास्त वजन आणि रक्तातील साखरेची वाढलेली पातळी दोन्ही किडनी खराब करण्याचे काम करतात, अशावेळी बदामाचे तेल किडनीच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.
काळ्या डागांनी चेहरा खराब झालाय? किचनमधला १ पदार्थ, चेहरा होईल नितळ-डाग कमी
5) किडनी हेल्दी ठेवण्यासाठी सॅच्यरेडेट फॅट्सयुक्त तेलाचे सेवन फायदेशीर ठरते. एक्सपर्ट्सनी किडनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सुर्यफुलाचे तेल वापरण्याचा सल्ला दिला आहे. तेल कितीही फायदेशीर असलं तरी त्याचे नियंत्रित प्रमाणात सेवन करायला हवं. यासाठी एक्सपर्ट्स या तेलांचे ४ ते ५ चमचे सेवन करण्याचा सल्ला देतात.