प्रत्येकाच्या घरात स्वयंपाकासाठी वेगवेगळे तेल वेगवेगळ्या प्रमाणात वापरलं जातं. काहींच्या घरात जास्त तेल घातलेल्या भाज्या खाल्ल्या जातात तर काहींच्या जेवणात तेलाचं प्रमाण खूपच कमी असतं. तुम्ही किती प्रमाणात तेलाचं सेवन करता यावर हृदयाच्या आरोग्याची स्थिती अवलंबून असते. म्हणून बाहेरचे तेलकट पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. (What is the healthiest oil for cooking)
चांगल्या तब्येतीसाठी कोणतं तेल स्वयंपाकात वापरायचं? ( Best Oil for Your Health)
ऑलिव्ह ऑइलमध्ये अन्सॅच्यूरेटेड फॅटी ऍसिड आणि पॉलिफेनॉल संयुगे असतात, जे हृदयाला अनेक समस्यांशी लढण्यास मदत करतात. दररोज सुमारे अर्धा चमचे ऑलिव्ह ऑइलचे सेवन केल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका आणि कोरोनरी हृदयरोगाचा धोका कमी होतो. संशोधकांना असे आढळून आले की जे लोक दररोज अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईल खात होते त्यांना कोणत्याही प्रकारचे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होण्याचा धोका 15% कमी असतो आणि कोरोनरी हृदयरोगाचा धोका 21% कमी असतो.
इंटरमाऊंटन हेल्थकेअरच्या रिपोर्टनुसार ऑलिव्ह ऑइल तुम्ही कमी तेलात जेवण बनवण्यासाठी वापरू शकता. पण पदार्थ तळताना ऑलिव्ह ऑइल हा सर्वोत्तम पर्याय नाही कारण त्याचा स्मोक पॉइंट कमी असतो. तळण्यासाठी तेल पुरेसे गरम करावे लागते आणि त्यातून निघणारा धूर धोका निर्माण करतो. म्हणून सॅलेड ड्रेसिंगसाठी, शिजवलेल्या भाज्यांवर घालण्यासाठी या तेलाची शिफासर केली जाते.
हृदयाचे आरोग्य चांगले राहते
या तेलात ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आढळतात, जे जळजळ कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल सुधारण्यात मदत करतात. याशिवाय, ऑलिव्ह ऑइल रक्तवहिन्यासंबंधी कार्य आणि हृदयाचे आरोग्य तसेच कार्यक्षमता सुधारते. या तेलामध्ये पॉलिफेनॉलचे प्रमाण जास्त असते, जे चांगले लिपिड प्रोफाइलमध्ये मदत करते आणि जळजळ कमी करते.
ऑलिव्ह ऑइलमध्ये आढळणारे पॉलीफेनॉल हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करतात. याशिवाय हे तेल उच्च रक्तदाबावरही खूप फायदेशीर आहे. म्हणजेच त्यात असलेले पॉलीफेनॉल आणि मोनोसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड रक्तदाब नियंत्रित करतात.
वजन कमी करण्यास फायदेशीर
या तेलामध्ये पॉलिफेनॉलचे प्रमाण जास्त असते, जे चांगले लिपिड प्रोफाइलमध्ये मदत करते आणि जळजळ कमी करते. ऑलिव्ह ऑइलमध्ये आढळणारे पॉलीफेनॉल हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करतात. याशिवाय हे तेल उच्च रक्तदाबावरही खूप फायदेशीर आहे. म्हणजेच त्यात असलेले पॉलीफेनॉल आणि मोनोसॅच्युरेटेड फॅटी एसिड रक्तदाब नियंत्रित करतात.