Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सारखं डोकं दुखतं- काय करावं सुचत नाही? बघा सोपे व्यायाम, दुखणाऱ्या डोक्याला मिळेल आराम..

सारखं डोकं दुखतं- काय करावं सुचत नाही? बघा सोपे व्यायाम, दुखणाऱ्या डोक्याला मिळेल आराम..

Best Exercises To Get Quick Relief Headache: डोकेदुखीचा त्रास सतत होत असेल तर हे काही साधे- सोपे व्यायाम करून पाहा, दुखणाऱ्या डोक्याला चटकन आराम मिळेल..(how to reduce headache?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2024 05:12 PM2024-10-03T17:12:14+5:302024-10-03T17:12:53+5:30

Best Exercises To Get Quick Relief Headache: डोकेदुखीचा त्रास सतत होत असेल तर हे काही साधे- सोपे व्यायाम करून पाहा, दुखणाऱ्या डोक्याला चटकन आराम मिळेल..(how to reduce headache?)

best exercises to get quick relief headache, how to reduce headache, simple home remedies for reducing headache | सारखं डोकं दुखतं- काय करावं सुचत नाही? बघा सोपे व्यायाम, दुखणाऱ्या डोक्याला मिळेल आराम..

सारखं डोकं दुखतं- काय करावं सुचत नाही? बघा सोपे व्यायाम, दुखणाऱ्या डोक्याला मिळेल आराम..

Highlightsडोकं ठणकायला लागलं की लगेच गोळी घेण्याची सवय अनेकींना असते. पण त्यापेक्षा हे काही साधे- सोपे व्यायाम करून पाहायला हवेत

डॉ. अंबिका याडकीकर
फिजियोथेरपीस्ट

बरेच लोक असे असतात की त्यांचं सतत डोकं दुखतं. खाण्यापिण्यात थोडे बदल झाले, झोपेच्या वेळा बिघडल्या की त्यांचं लगेच डोकं ठणकायला लागतं, डोकं दुखण्यासाठी त्यांना कोणतंही छोटंसं कारण पुरेसं होतं. डोकेदुखीच्या बाबतीत महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा थाेडे जास्तच आहे. स्वयंपाक घरातले सततचे आवाज, लहान मुलांचा गोंधळ ही सगळी कारणंही त्यामागे आहेतच. डोकं ठणकायला लागलं की लगेच गोळी घेण्याची सवय अनेकींना असते. पण त्यापेक्षा हे काही साधे- सोपे व्यायाम करून पाहायला हवेत (how to reduce headache?). त्यामुळे डोकेदुखी थांबण्यासाठी निश्चितच मदत होईल. ते व्यायाम नेमके कोणते आणि कसे करावे ते पाहा... (Best Exercises To Get Quick Relief Headache)

 

डोकेदुखी कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावे?

१. डोकेदुखी थांबविण्यासाठी डोक्याजवळचे स्नायू रिलॅक्स करणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमच्या दोन्ही भुवया बोटांनी पकडा आणि त्यानंतर त्या वर- खाली या पद्धतीने हलवा. त्यानंतर बाहेरच्या बाजुने ओढा व पुन्हा आतल्या बाजुने ओढा. 

चेहरा ड्राय होऊन काळा पडला? माधुरी दीक्षित सांगते खास उपाय; १० मिनिटांत चेहऱ्यावर येईल ग्लो 

२. दोन्ही भुवयांच्या मधे जो भाग असतो त्या भागावर बोटाने थोडा दाब द्या आणि तो भाग गोलाकार दिशेने फिरवत त्यावर दाब द्या. डोकेदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

३. गालाचे काही व्यायाम करूनही डोकेदुखी कमी होते. त्यासाठी गाल फुगवा. तोंडात पाणी आहे असे समजून चूळ भरल्याप्रमाणे तोंडाची हालचाल करा. यामुळे चेहऱ्याच्या काही भागातले स्नायू मोकळे होतात आणि डोकेदुखी कमी होते.

 

हे व्यायामही तुम्ही करू शकता

डोकेेदुखीचा त्रास होत असेल तर वरील व्यायाम तर तुम्ही करू शकताच, पण त्यासोबतच जर मायग्रेनचा त्रास होत असेल तर पुढे सांगितलेली काही योगासनं करून पाहा...

जोर लावूनही पोट साफ होतच नाही? ३ पद्धतींनी शरीराची हालचाल करा- पोट लगेचच मोकळं होईल

१. व्रजासन करून कपाळ जमिनीवर टेकविणे.

२. कॅट- कॉ पोझ

३. गोमुखासन

४. मर्कटासन

५. शवासन

 

Web Title: best exercises to get quick relief headache, how to reduce headache, simple home remedies for reducing headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.