Join us   

गॅसच्या त्रासानं पोट डब्ब होतं? रोजच्या जेवणात ४ पदार्थ खा, गॅस-ब्लोटींगचा त्रासच होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 1:56 PM

Best food for gas and bloating : गॅस, ब्लोटींग आणि भूक न लागणं यांसारख्या समस्यांचे कारण ठरते.

गॅसच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यानं मोठ्या समस्या उद्भवू शकतात.  गॅसचा त्रास वाढण्यामागे अनेक कारणं असू शकतात. डायजेस्टीव्ह सिस्टीमध्ये बिघाड झाल्यास हा त्रास होतो. (The Best Foods to Avoid Gas and Bloating) गॅस, ब्लोटींग आणि भूक न लागणं यांसारख्या समस्यांचे कारण ठरते. (Foods to Help You Ease Bloating) गॅसमुळे पोट फुगल्यासारखं वाटतं, व्यवस्थित पोट साफ होत नाही याशिवाय मल कडक होण्याचीही शक्यता असते.  रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर गंभीर समस्या टाळता येऊ शकतात. (Best food for gas and bloating)

गॅस ब्लोटींगची कारणं

काही लोक खूप वेगानं जेवतात. जेवण व्यवस्थित चावलं गेलं नाही तर पचायला वेळ लागतो अशावेळी अधिक गॅस उत्सर्जित होतो. काहीजणांना मसालेदार पदार्थ खाल्ल्यानं गॅस जाणवतो.  काही खास औषधांमुळेही  तोंड सुकतं आणि तोंडाला वास येऊन पोटात गॅस तयार होतो. जर तुम्हाला गॅसमुळे जडपणा जाणवत असेल आणि पोटाच्या खालच्या भागात वेदना होत असतील तर गॅस्ट्रोइंटेस्टायनल इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं. 

५ फळं आणि भाज्या रोज खा, कॅल्शियमचा खजाना-म्हातारपणातही शरीरातील सगळी हाडं राहतील ठणठणीत

ओट्स

ओट्समध्ये डायजेटिव्ह फायबर्स अधिक प्रमाणात असतात. यामुळे स्टूलमध्ये पाण्याची कमतरता होत नाही आणि स्टूल पास करणं सोपं होतं. तुम्ही ओट्स चिला, ओट्स इडली, दलिया या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. 

पोट आणि मांड्या खूप सुटल्या, जाडजूड दिसता? ६ पदार्थ रोज खा, घटेल चरबी लवकर

तूप किंवा नारळाचं तेल

तूपात ब्युरिटीक एसिड जास्त प्रमाणात असते. यामुळे गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. याशिवाय  पोटदुखी, ब्लोटींग अन्य लक्षणंही कमी होतात. नारळाच्या तेलात फॅटी एसिड्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे स्टूल सॉफ्ट करण्यास मदत होते. याशिवाय सकाळी कोमट पाण्यासह एक चमचा तूप किंवा नारळाचं तेल घेतल्यानं मोशन व्यवस्थित होते आणि गॅसपासून सुटका मिळते. 

चिया सिड्स

चिया सिड्समध्येही डायजेटिव्ह फायबर्स असतात. ज्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली राहते.  १ ते ३ टेबलस्पून भिजवलेल्या चिया सिड्स तुम्ही फळं,  पाणी किंवा नारळपाण्यासह खाऊ शकता. 

त्रिफळा चूर्ण

त्रिफळा चूर्णात आवळा, हरड  असे  मुख्य हर्ब्सचे मिश्रण असते. या तिन्हींमुळे कॉन्स्टीपेशनपासून आराम मिळतो. झोपण्याआधी १ चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासह घ्या.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स