शरीराला निरोगी राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटामीन्स आणि मिनरल्सची आवश्यकता असते. कोणत्याही प्रकारचे व्हिटामीन्स, मिनरल्स कमी झाले तर इतर समस्या उद्भवू शकतात. (Best Food For Vitamin B-12) या व्हिटामीन्समध्ये व्हिटामीन बी-१२ महत्वपूर्ण मानले जाते. हे सोल्यूबल असते, व्हिटामीन बी-१२ युक्त पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही याची कमतरता भरून काढू शकता. (These 5 Signs Of Vitamin b-12 deficiency that appears at Night)
शरीरात व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेची अनेक मुख्य कारणं आहेत. ज्यात रेड ब्लड सेल्स तयार करणं, सेल मेटाबॉलिझ्म वाढवणं, डिएनए तयार करणं या गोष्टींचा समावेश आहे. शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास वेगवेगळ्या शारीरिक समस्या उद्भवतात. व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेची लक्षणं समजून घेऊ.
३० दिवसांत वजन कमी करण्याचा डॉक्टर सांगतात खास हेल्दी उपाय, पोटही होईल कमी
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसार दूध, दही, केळी, चीझ, पालक या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. व्हिामीन बी-१२ अन्नातील प्रथिनांशी संबंधित आहे. अन्नात लाळ मिसळल्यावर तोंडात प्रक्रिया सुरू होते. व्हिटामीन बी-१२ लाळेमध्ये कोबालामिन बायडिंग प्रोटीन हॅप्टोकोरिनशी संबंधित आहे. पोटातील हायड्रोक्लोरिक एसिड आणि अन्न मॅट्रिक्समधून व्हिटामीन बी-१२ रिलीज होते.
शरीरात व्हिटामीन बी-१२ कमी झाल्याची लक्षणं (Symptoms Of B-12 Deficiency)
१) शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास मांसपेशींमध्ये कमकुवतपणा, कमजोरी अशी लक्षणं जाणवतात. या कारणांमुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. ज्यामळे मांसपेशींमध्ये कमकुवतपणा येतो.
२) शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास रात्रीच्यावेळी गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या उद्भवतात. अशा स्थितीत तुम्हाला उलट्या, जुलाब, गॅस, सूज आणि अन्य गॅस्टोइंटेस्टायनल लक्षणं दिसू शकतात. व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास एनिमियाचा त्रास उद्भवतो आणि प्रिमॅच्युर रेड ब्लड सेल्समुळे आपली त्वचा पिवळी पडू लागते अशी लक्षणं दिसल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.
३) शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास मायग्रेनच्या वेदना उद्भवू शकतात. ज्यामुळे गंभीर डोकेदुखी उद्भवते. ज्या कारणांमुळे रात्री झोप येत नाही.
पोट सुटलं-व्यायामालाही वेळ नाही? या बिया सकाळी कोमट पाण्यात घालून प्या, पाहा बदल
४) शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास शरीरातील रेड ब्लड सेल्सच्या उत्पादनावर परिणाम होतो. शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासते आणि थकवा येतो. रात्रीच्यावेळी हा थकवा जास्त येऊ शकतो.