Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > फॅटी लिव्हरचा त्रास? तज्ज्ञ सांगतात ५ सोपे उपाय, जेवणातले छोटेसे बदल लिव्हर ठेवतील ठणठणीत.. 

फॅटी लिव्हरचा त्रास? तज्ज्ञ सांगतात ५ सोपे उपाय, जेवणातले छोटेसे बदल लिव्हर ठेवतील ठणठणीत.. 

How To Reduce Fatty Liver Problem: फॅटी लिव्हर म्हणजेच यकृतामध्ये चरबी होण्याचा त्रास आता खूप जणांना होत आहे. हा त्रास टाळण्यासाठी हे काही सोपे उपाय पाहून घ्या... (best foods to nourish and heal your liver)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2024 05:24 PM2024-08-08T17:24:19+5:302024-08-08T17:25:13+5:30

How To Reduce Fatty Liver Problem: फॅटी लिव्हर म्हणजेच यकृतामध्ये चरबी होण्याचा त्रास आता खूप जणांना होत आहे. हा त्रास टाळण्यासाठी हे काही सोपे उपाय पाहून घ्या... (best foods to nourish and heal your liver)

best food to nourish and heal your liver, how to reduce fatty liver problem, expert suggests best remedies for fatty liver problem | फॅटी लिव्हरचा त्रास? तज्ज्ञ सांगतात ५ सोपे उपाय, जेवणातले छोटेसे बदल लिव्हर ठेवतील ठणठणीत.. 

फॅटी लिव्हरचा त्रास? तज्ज्ञ सांगतात ५ सोपे उपाय, जेवणातले छोटेसे बदल लिव्हर ठेवतील ठणठणीत.. 

Highlightsहा त्रास आपल्याला होऊ नये किंवा असेल तरी ताे जास्त वाढू नये यासाठी काय उपाय करायचा ते पाहा...

लिव्हर किंवा यकृत हा आपल्या शरीरातला एक महत्त्वाचा अवयव. रक्तातले विषारी पदार्थ शोषून ते शरीराबाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम लिव्हर करते. आपली बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्यातला बदल, व्यायामाचा अभाव यासारख्या अनेक कारणांमुळे लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी जमा व्हायला सुरुवात होते. जेव्हा ती चरबी एका विशिष्ट पातळीच्या वर जाते तेव्हा त्याला फॅटी लिव्हर म्हणून ओळखले जाते. हल्ली हा त्रास खूप लोकांना होत आहे (expert suggests best remedies for fatty liver problem). अल्कोहोल अतिप्रमाणात घेणाऱ्या लोकांनाही त्याचा धोका आहेच. त्यामुळेच हा त्रास आपल्याला होऊ नये किंवा असेल तरी ताे जास्त वाढू नये यासाठी काय उपाय करायचा ते पाहा...(best food to nourish and heal your liver)

 

लिव्हरचं आरोग्य जपण्यासाठी उपाय

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात कोणते पदार्थ घ्यावेत, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ तज्ज्ञांनी versatilevivesgallery या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

श्रावण स्पेशल: कांदा- लसूण न घालता करा हॉटेलसारखी चमचमीत ग्रेव्ही- बघा एकदम सोपी रेसिपी 

यामध्ये ते सांगतात की लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात बदल करणे ही सगळ्यात मुख्य गोष्ट आहे. त्यातूनच लिव्हरमधील फॅट कमी करणे शक्य आहे. त्यासाठी आपण रोज ॲण्टीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर असणारे फळं खायला पाहिजेत. त्यातून लिव्हरमधील फॅट आणि ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी होण्यास मदत होईल.

तसेच हिरव्या पालेभाज्याा आणि त्यातही पालक खाण्यावर अधिक भर द्यावा. 

 

ॲण्टीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट देणारे बदाम आणि अक्रोड लिव्हरचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत  करतात. 

ऑलिव्ह ऑईलमध्ये असणारे मोनोसॅच्युरेटेड फॅट फॅटी लिव्हरचा त्रास कमी करतात. तसेच शरीरातील इन्सुलिन निर्मितीसाठीही मदत करतात.

कॅस्टर ऑईल केसांना कसं लावावं? बघा खास पद्धत- केसांच्या सगळ्या समस्यांवर उत्तम उपाय

लसुणामध्ये ॲण्टी इन्फ्लेमेट्री गुणधर्म अधिक असतात. ते शरीरातील चरबी आणि वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. तसेच ते लिव्हरमधील चरबी कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरतात.  



 

Web Title: best food to nourish and heal your liver, how to reduce fatty liver problem, expert suggests best remedies for fatty liver problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.