Join us   

किडनीचे आजार होवू नयेत म्हणून नियमित खा ५ भाज्या आणि फळं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 12:48 PM

Best Foods To Eat for Kidney : किडनीचे कार्य चांगले राहण्यासाठी शरीर डिटॉक्स होणं फार महत्वाचं आहे.  किडनी डिटॉक्स होण्यासाठी कोणती फळं फायदेशीर ठरतात ते पाहूया.

किडनी आपल्या शरीरातील एक महत्वपूर्ण अवयवांपैकी एक आहे. ज्याकडे लक्ष देणं  फार महत्वाचं आहे. कारण किडनी आपल्या शरीरात गाळणीप्रमाणे काम करते. यामुळे शरीरातील हानीकारक टॉक्सिन्स बाहेर निघण्यास मदत होते. (Best Foods To Eat for Kidney) हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार जर किडनीचं कार्य व्यवस्थित नसेल तर शरीरात तयार झालेले जास्तीचे मिनरल्स, केमिकल्स, सोडियम, कॅल्शियम, फॉस्फरस, पाणी, पोटॅशियम, फॉस्फेट, ग्लूकोज व्यवस्थित फ्लश आऊट होऊ शकणार नाहीत. (Foods That Can Causes Kidney Stones)  किडनीचे कार्य चांगले राहण्यासाठी शरीर डिटॉक्स होणं फार महत्वाचं आहे.  किडनी डिटॉक्स होण्यासाठी कोणती फळं फायदेशीर ठरतात ते पाहूया. (Foods that help to Prevent Kidney Stones)

बेरी

बेरीजमध्ये स्ट्रॉबेरी, क्रॅनबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी, ब्लॅकबेरी यांचा समावेश होतो. ही फळे अनेक प्रकारच्या अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्सने समृद्ध असतात. त्यांच्या सेवनामुळे मूत्रपिंडाच्या पेशींमध्ये ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ होण्याचा धोका कमी होतो. म्हणूनच ही फळे किडनी डिटॉक्समध्ये प्रभावी मानली जातात.

कलिंगड

किडनी डिटॉक्स करण्यासाठी कलिंगड खूप प्रभावी मानले जाते. यात 90 टक्के पाणी अनेक पोषक तत्वांनी भरलेले असते. कलिंगड किडनी खराब होण्याचा धोका कमी करते. यात असलेले लाइकोपीन कंपाऊंड किडनीतील सूज नष्ट करते आणि किडनीत फॉस्फेट, ऑक्सलेट, सायट्रेट आणि कॅल्शियम संतुलित करण्यास मदत करते.

संत्री आणि लिंबू

लिंबू आणि संत्री किडनी स्वच्छ करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. फळांचा रस किडनी स्टोनपासून बचाव करतो. यासोबतच ते संपूर्ण शरीरातील द्रवपदार्थ संतुलित करते. त्याचे नियमित सेवन किडनी निरोगी आणि मजबूत ठेवते.

पपई

पपई आरोग्यासाठी उत्तम मानली जाते. त्यात उच्च पोषक आणि फायबर आढळतात. पपई व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी आणि फायटो व्हिटॅमिनचा चांगला स्रोत आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात, ज्यामुळे आपली किडनी निरोगी राहते. किडनी नेहमी निरोगी ठेवण्यासाठी पपईचे सेवन केले पाहिजे.

कोबी

जर तुम्हाला किडनीचा संसर्ग टाळायचा असेल तर तुमच्या ताटात कोबीचा अवश्य समावेश करा. कोबीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट असते. जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून किडनीच्या संसर्गापासून संरक्षण करते. त्याचबरोबर कोबीतील दाहक-विरोधी गुणधर्म किडनीचे नुकसान टाळतात.

टॅग्स : हेल्थ टिप्स