Join us   

पिवळे दात होतील पांढरेशुभ्र, दात किडणं, हिरड्या दुखणंही बंद- डेंटिस्ट सांगतात १ सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2024 12:17 PM

Best Home Remedies For All Problems Related To Teeth: दातांच्या बाबतीत कोणतीही तक्रार असेल तर ती दूर करण्याचा एक सोपा उपाय पाहा...

ठळक मुद्दे दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी किंवा दातांच्या बाबतीतली कोणतीही समस्या, त्रास कमी करण्यासाठी काय उपाय करावा, याविषयी....

दातांचं दुखणं हल्ली बऱ्याच जणांच्या बाबतीत वाढलं आहे. लहान मुलांचे दात तर खूपच लवकर किडत आहेत. कारण बहुतांश मुलं चॉकलेट किंवा गोड पदार्थ जास्त प्रमाणात खातात आणि त्यानंतर दातांची हवी तशी स्वच्छता होत नाही. यामुळे मग दात किडतात. शिवाय मोठ्या माणसांच्या बाबतीत सांगायचं झालं तर दातांवर पिवळेपणा येणे, हिरड्या दुखणे, तोंडातून दुर्गंधी येणे (best solution for sour gum and mouth odour) असा त्रासही अनेकांना जाणवतो. यामुळे मग चारचौघांत खूप अवघडल्यासारखं होतं (how to get rid of yellowish colour on teeth). हा त्रास कमी करण्यासाठी स्वत: डेंटिस्टनेच एक सोपा उपाय सांगितला आहे. (homemade dant manjan)

 

दातांचा पिवळेपणा कसा घालवायचा?

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी किंवा दातांच्या बाबतीतली कोणतीही समस्या, त्रास कमी करण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीचा व्हिडिओ एका डेंटीस्टने स्वत:च myplantsmygarden या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

 

स्टीलच्या नळांना, शॉवरला पांढरट डाग पडले? यापैकी कोणताही १ उपाय करा- नळ होतील चकाचक

यामध्ये त्यांनी दात स्वच्छ करण्यासाठी घरच्याघरी कशा पद्धतीने आयुर्वेदिक दंतमंजन तयार करावे, याविषयीची माहिती दिली आहे. 

घरच्याघरी दंत मंजन तयार करण्यासाठी लवंग, ज्येष्ठमध, दालचिनी, तोमर सीड, कडुलिंबाची वाळलेली पानं, आगरकारा आणि चारकोल हे सगळे पदार्थ प्रत्येकी ५० ग्रॅम एवढ्या प्रमाणात घ्यायचे आहेत. 

 

यानंतर हे सगळे पदार्थ एका ताटात ठेवा आणि कडक उन्हात  २ ते ३ दिवस वाळू द्या. त्यानंतर ते मिक्सरमधून फिरवा आणि त्यांची बारीक पावडर करून घ्या.

मुलांना लवकरात लवकर शाळेत घालावं का? मूल शाळेत प्ले ग्रुपला घालण्याचं योग्य वय कोणतं?

ही पावडर नंतर एखाद्या गाळणीने गाळून घ्या आणि डबीत भरून ठेवा. हे झालं तुमचं आयुर्वेदिक दंत मंजन तयार. इतर कोणत्याही दंत मंजनने आपण ज्याप्रकारे दात घासतो, त्याचप्रमाणे हे मंजन वापरून दिवसातून एकदा ब्रश करा. फक्त इतर मंजनच्या तुलनेत या मंजनचं प्रमाण थोडं कमी घ्यावं.

 

टॅग्स : आरोग्यहोम रेमेडी