Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पायांच्या तळव्यांची जळजळ होते? ५ घरगुती उपाय - पायांची आग होईल बंद लवकर

पायांच्या तळव्यांची जळजळ होते? ५ घरगुती उपाय - पायांची आग होईल बंद लवकर

Best Home Remedies for Burning Feet : उन्हाळ्यात पायांच्या तळव्यावर जळजळ होण्याची समस्या सुटेल फक्त..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2024 03:26 PM2024-05-22T15:26:50+5:302024-05-22T21:21:28+5:30

Best Home Remedies for Burning Feet : उन्हाळ्यात पायांच्या तळव्यावर जळजळ होण्याची समस्या सुटेल फक्त..

Best Home Remedies for Burning Feet | पायांच्या तळव्यांची जळजळ होते? ५ घरगुती उपाय - पायांची आग होईल बंद लवकर

पायांच्या तळव्यांची जळजळ होते? ५ घरगुती उपाय - पायांची आग होईल बंद लवकर

आजच्या काळात अनेक लोक आरोग्याशी संबंधित विविध समस्यांशी झुंजताना दिसतात (Burning Feet). यापैकी एक म्हणजे पाय जास्त गरम होणे किंवा जळजळ होणे (Home Remedies). साधारणपणे ही समस्या विशिष्ट वयानंतरच लोकांमध्ये दिसून येते. वास्तविक, यामागे अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात, जसे की शरीरात पाण्याची कमतरता, पायांमध्ये रक्ताभिसरण वाढणे, काही प्रकारची ऍलर्जी किंवा मधुमेह इत्यादी.

बर्‍याच वेळा ही समस्या अधूनमधून उद्भवते, परंतु जर पायांच्या तळव्यांची आग होत असेल किंवा तीव्र खाज सुटत असेल तर, काही घरगुती उपाय करून पाहा. बर्निंग फीट सिंड्रोमपासून आराम मिळेल. शिवाय पायांची जळजळ कमी होईल(Best Home Remedies for Burning Feet).

ऍपल सायडर व्हिनेगर

सफरचंद सायडर व्हिनेगर बर्निंग फीट सिंड्रोमपासून आराम देते. यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे संसर्ग कमी होते. हे तळव्यामध्ये रक्ताभिसरण देखील सुधारते. शिवाय पायाच्या त्वचेची पीएच पातळी देखील सुधारते. आपण याचा थेट वापर पायांवर करू शकता.

दुपारचं जेवणानंतर '५' गोष्टी न चुकता कराच; व्यायाम न करताही पोट होईल सपाट- वजनही घटेल

थंड पाण्याचा वापर

तळव्यामध्ये जळजळ कमी करण्यासाठी बर्फाचे पाणी उपयुक्त ठरू शकते. त्यात किमान १५ मिनिटे पाय ठेवा. जर आपल्याला त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर बर्फाच्या पाण्यात पाय ठेवू नका. उन्हाळ्यात बर्फ घरी किंवा बाजारात सहज उपलब्ध होईल.

हळद

हळद फक्त स्वयंपाकासाठी नसून, त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. यामध्ये दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. हे गुणधर्म जळजळ कमी करण्यात मदत करतात. यासह मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेच्या पेशींचे संरक्षण करण्यात मदत करू शकतात. ज्यामुळे त्वचा उजळते. आणि फंगल इन्फेक्शनपासून सरंक्षण होते.

मांडी घासली जाऊन आगआग होते? ४ घरगुती टिप्स; मिनिटात लालसर झालेली त्वचा होईल नॉर्मल

एप्सम सॉल्ट

पायांची जळजळ कमी करण्यासाठी आपण एप्सम सॉल्टचा वापर करू शकता. यात मॅग्नेशियम सल्फेट क्रिस्टल्स असतात. जे पायांना थंडावा देतात. यासाठी पाण्यात चमचाभर एप्सम सॉल्ट घालून मिक्स करा. त्यात १५ ते २० मिनिटांसाठी ठेवा. यामुळे पायांना जळजळ कमी होईल. 

Web Title: Best Home Remedies for Burning Feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.