हिवाळ्याच्या दिवसांत जुनाट सर्दी- खोकल्याचा त्रास चांगलाच उफाळून येतो. कधी कधी औषध- गोळ्या घेऊनही म्हणावं तसा फरक पडत नाही. किंवा सर्दी- खोकल्यासाठी सारखी- सारखी औषधी घेणंही बरं वाटत नाही. त्यामुळे हा एक घरगुती आयुर्वेदिक आणि आजीच्या बटव्यातला खास उपाय करून बघा. जुनाट खोकला आणि सर्दी (home remedies for cough and cold) कमी होण्यासाठी निश्चितच मदत होईल. हा उपाय इन्स्टाग्रामच्या mamtakitchensense या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
जुनाट सर्दी- खोकल्यावर घरगुती उपाय
साहित्य
५० ग्रॅम आलं
१५० ग्रॅम गूळ
घागरा- लेहेंगा घ्यायचाय? १ हजारपेक्षाही कमी किमतीत ३ सुंदर पर्याय, अगदी स्वस्तात मस्त खरेदी
१ चमचा तूप
अर्धा चमचा काळं मीठ
अर्धा चमचा हळद पावडर
पाव चमचा मिरे पूड
अर्धा चमचा वेलची पावडर
रेसिपी
१. यासाठी सगळ्यात आधी गॅसवर एखादी पापड भाजण्याची जाळी ठेवा आणि त्यावर आलं भाजून घ्या.
२. आलं भाजून घेतल्यानंतर ते पाण्यात टाकून स्वच्छ करून घ्या आणि त्याची सालं काढून टाका.
३. त्यानंतर मिक्सरमध्ये घालून आल्याची बारीक पेस्ट करून घ्या.
४. गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई तापली की त्यात तूप घाला.
५. तूप तापल्यानंतर त्यात आल्याची पेस्ट टाका आणि परतून घ्या.
६. आल्याची पेस्ट परतून झाली की त्यात गूळ आणि वेलची पावडर सोडून इतर सगळेच पदार्थ टाका.
७. सगळं मिश्रण एकत्र करून व्यवस्थित कालवून घ्या. वारंवार हलवत रहा. थोड्या वेळाने हे मिश्रण आळून येईल. त्यानंतर गॅस बंद करा.
८. मिश्रण थंड होऊ द्या. त्यानंतर हाताला थोडं तूप लावा आणि या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवा.
९. गोळ्यांना आणखी चांगली चव येण्यासाठी त्या वेलची पावडरमध्ये घोळून घ्या.
स्ट्रेस घालवून रिफ्रेश होण्यासाठी ट्विंकल खन्ना करते १ भन्नाट उपाय... बघा तिचा व्हायरल व्हिडिओ
१०. जेवण झाल्यावर किंवा रात्री झोपण्यापुर्वी एखादी गोळी चघळून खा. दिवसांतून २ गोळ्या खाल्ल्या तरी चालेल. फक्त गोळ्या घेतल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका.