Join us   

पांढरेशुभ्र मजबूत दात हवेत? तज्ज्ञ सांगतात दातांच्या आरोग्यासाठी २ सोपे घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2022 12:53 PM

Best Home Remedies for Dental Hygiene : 5 मिनीटांत करता येतील असे उपाय, दात राहतील कायम चांगले...

ठळक मुद्दे दातांचे आरोग्य चांगले असेल तर आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. दातांचे दुखणे ओढवून घेण्यापेक्षा वेळीच योग्य ते उपाय केले तर त्याचा निश्चितच फायदा होतो.

दात हे आपल्या शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा मात्र सगळ्यात जास्त दुर्लक्षित असणारा भाग आहे. आपण दिवसभर ज्या दातांनी खातो ते दात मजबूत असणं आवश्यक आहे. मात्र घाईगडबडीत आपण त्याकडे पुरेसे लक्ष देत नाही. त्यामुळे कधी दात किडतात तर कधी खूप पिवळे पडतात. एकदा दात किडायला सुरुवात झाली की त्यावर उपचार घेण्याशिवाय काहीही पर्याय नसतो. यामुळे कमी वयातच किडलेले दात काढावे लागणे, दातांमध्ये कॅप बसवणे असे उपाय कराव लागतात. (Best Home Remedies for Dental Hygiene) पण वेळीच काळजी घेतल्यास आपली दातांच्या दुखण्यापासून सुटका होऊ शकते. दातांचे दुखणे सगळ्यात वाईट असे म्हटले जाते, कारण एकदा दात दुखायला लागले की काहीच सुधरत नाही. (How to Get Rid of Yellow Teeth, Dental Cavity) तसेच दातांवरील उपचारांचा खर्चही जास्त असतो. अशावेळी दातांची चांगली काळजी घेतल्यास फायदा होतो. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र दातांची काळजी घेण्यासाठी घरच्या घरी करता येतील असे २ उपाय सांगतात ते कोणते पाहूया (Natural Way to Remove Dental Plaque).

(Image : Google)

प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून सतत सी व्हिटॅमिनच्या गोळ्या घेता? 3 साईड इफेक्टस...

१. बेकींग सोडा 

१ चमचा बेकींग सोडा घेऊन त्यामध्ये थोडे पाणी घाला. हे मिश्रण हलवून त्याची पेस्ट तयार करा. टूथब्रश या पेस्टमध्ये बुडवून त्याने दात स्वच्छ घासा. ब्रश गालोकार फिरवल्यास दातांवर अडकलेले अन्नाचे कण निघून जाण्यास मदत होईल. यानंतर पाण्याने भरपूर चुळा भरा. एक दिवसाआड हा प्रयोग नक्की करायला हवा. तुम्ही दिवसातून दोन वेळा दात घासत असाल तर एकदा टुथपेस्टऐवजी बेकींग सोडा वापरा. यामुळे दातांचे किडीपासून संरक्षण होण्यास मदत होईल. सोड्यामध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असल्याने त्याचा दात चांगले राहण्यास उपयोग होतो. दातांवर असणारे कॅल्शियम किंवा इनॅमल हा घटक टिकून राहण्यासाठी सोडा चांगला असतो. त्यामुळे हा उपाय नक्की करुन बघा. 

(Image : Google)

अंधारात झोपच येत नाही, रात्री लाइट चालू ठेवून झोपता? ही सवय घातक, तज्ज्ञ सांगतात..

२. तेलाने चुळा भरणे 

आपण खात असलेले कोणतेही तेल घेऊन ते तांडात भरुन घ्यावे आणि त्याने तोंडातल्या तोंडात चुळ भरावी. काही वेळ चूळ भरल्यानंतर हे तेल बाहेर थुंकून द्यावे. यासाठी खाण्यासाठी वापरले जाणारे खोबरेल तेल सगळ्यात चांगले. खोबरेल तेलात अँटी इन्फ्लमेटरी आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म असल्याने दातांवर साचलेली घाण, किड निघून जाण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. आठवड्यातून ३ वेळा हा उपाय करायला हवा. यामुळे दातांचा पिवळेपणा कमी होण्यास फायदा होतो. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सदातांची काळजी