प्रत्येकाचीच जीवनशैली सध्या खूप बदलली आहे. व्यायामाचा अभाव, मैद्याच्या वेगवेगळ्या पदार्थांचे अतिसेवन यामुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होत आहे. पोट साफ व्हायला खूप वेळ लागतो. असा त्रास कमी करण्यासाठी नेमका काय उपाय करावा, याविषयी आहारतज्ज्ञांनी एक खास माहिती दिली आहे. यासाठी आपल्याला खूप काही वेगळं करण्याची गरज नाही. फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने तूप (ghee) खायचं आहे. ते नेमकं कसं ते आता पाहूया..(best home remedies for reducing constipation by eating ghee)
बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी उपाय
बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी jist.news या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
तुम्ही आठवणीने खाता ना हिवाळ्यातलं 'हे' सुपरफूड? तब्येत ठणठणीत ठेवणारे स्वस्तात मस्त ३ पदार्थ
यामध्ये आहारतज्ज्ञ कविता देवगण सांगतात की तूप खाल्ल्यामुळे आतड्यांचे काम अधिक उत्तम होऊन पोट स्वच्छ होण्यास मदत होते. त्यासाठी दररोज सकाळी एक ग्लास गरम पाणी घ्या आणि त्यामध्ये १ चमचा तूप टाकून प्या. सकाळी रिकाम्यापोटी हा उपाय नियमितपणे करा.
जर तुम्हाला वरील पद्धतीने रिकाम्यापोटी तूप टाकलेलं गरम पाणी पिणं शक्य नसेल तर दररोज रात्री झोपण्यापुर्वी हळद टाकून दूध गरम करा. त्या दुधात थोडी मिरेपूड आणि एक चमचा तूप टाकून प्या. हा उपाय केला तरी तुमचा बद्धकोष्ठतेचा त्रास लगेच कमी होण्यास मदत होईल.
पोट साफ करण्यासाठी मनुका खा
पोट साफ होण्यासाठी किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी काळ्या मनुका दररोज नियमितपणे खाणेही फायदेशीर ठरू शकते, असं आहारतज्ज्ञ सांगत आहेत.
ख्रिसमस पार्टीत हॉट- स्टायलिश दिसण्यासाठी सेलिब्रिटींकडून घ्या खास टिप्स, बघा लाल ड्रेसमधले खास लूक
हा उपाय करण्यासाठी दररोज रात्री ४ ते ५ मनुका पाण्यात भिजत घाला आणि दुसऱ्यादिवशी सकाळी थोड्याशा तुपासोबत त्या खा. काही दिवस नियमितपणे हा उपाय करून पाहा. बद्धकोष्ठतेचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होईल.