पावसाळा हा एक असा ऋतू आहे की तो जेवढा आनंद देतो तेवढाच कधी कधी तापदायकही ठरतो. कारण या दिवसांत स्वच्छतेची, आहाराची, तब्येतीची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. कधी धो धो पाऊस पडतो, तर कधी नुसतंच आभाळ असतं. कधी हवेत खूप गारवा असतो तर कधी खूप घाम- घाम होतं. अशा सतत बदलत्या वातावरणामुळे मग हवादेखील दुषित होते. हवेतील सुक्ष्म जंतूंचे, बॅक्टेरियाचे प्रमाण वाढते आणि त्यामुळेच या दिवसांत संसर्गजन्य आजारांचे प्रमाण खूप वाढलेले असते (best home remedy in monsoon to fight infections). तसेच घरात डास, चिलटं, माशा होणं किंवा मग घरात सतत कुबट, कोंदट वास येणं हे देखील या दिवसांत होतंच (remedy to keep the environment free from microbes). हे सगळं कमी करायचं असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा...(how to get rid of mosquitos and house flies in monsoon?)
दमट, कोंदट हवेतील बॅक्टेरिया, जंतू कमी करण्यासाठी उपाय
पावसाळ्याच्या दिवसांत आपल्या घरातले आणि घराच्या आसपासचे वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी तसेच त्या भागातील सुक्ष्म जंतू, बॅक्टेरिया यांना नाहीसे करण्यासाठी कोणता घरगुती उपाय करावा, याविषयीची माहिती dr.manisha.mishra या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
उपवासाचं भाजणीचं थालीपीठ कधी वातड तर कधी कडक होतं? ५ टिप्स- थालीपीठ होईल परफेक्ट
यामध्ये त्यांनी घरातली हवा शुद्ध करण्यासाठी घरगुती पद्धतीने घरच्याघरी धूप कसा तयार करावा याची माहिती दिली आहे. त्यानुसार धूप तयार करण्यासाठी कडुलिंबाची वाळलेली पाने पाव वाटी, अर्धा टेबलस्पून गुग्गुळ, अर्धा टेबलस्पून कापूर आणि अर्धा टेबलस्पून पिवळी मोहरी असं साहित्य लागणार आहे.
हे सगळं साहित्य एखाद्या धूपदाणीमध्ये एकत्र करा आणि ते पेटवून त्याचा धूर करा. घरात धूपदाणी नसेल तर एखाद्या पणतीचाही वापर तुम्ही करू शकता.
पोटाला आराम देणारा आणि जिभेचेही चोचले पुरवणारा उपवास कसा करावा? आहारतज्ज्ञ सांगतात ५ टिप्स..
ही धूपदाणी आता घरात सगळीकडे फिरवून आणा. तसेच अंगणात, बाल्कनीमध्ये, टेरेसमध्येही न्या. जेणेकरून तिथली हवादेखील शुद्ध होईल. तुमच्या घराच्या आकारानुसार तुम्ही यात वापरण्यात आलेल्या पदार्थांचे प्रमाण कमी- जास्त करू शकता.