Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोट फुगल्यासारखं वाटतं, गॅस पासच होत नाही? ६ पदार्थ आहारात हवेत, गॅस- पचनाचे त्रास होतील दूर

पोट फुगल्यासारखं वाटतं, गॅस पासच होत नाही? ६ पदार्थ आहारात हवेत, गॅस- पचनाचे त्रास होतील दूर

Best Morning Drinks : मेथीच्या दाण्यांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. एक चमचा मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात टाकून रात्रभर ठेवा. सकाळी सर्वप्रथम याचे सेवन करा. तुमची रक्तातील साखर नियंत्रणात राहील.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 10:33 AM2023-04-04T10:33:04+5:302023-04-04T12:07:18+5:30

Best Morning Drinks : मेथीच्या दाण्यांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. एक चमचा मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात टाकून रात्रभर ठेवा. सकाळी सर्वप्रथम याचे सेवन करा. तुमची रक्तातील साखर नियंत्रणात राहील.

Best Morning Drinks : Best morning drinks for everyday to cure constipation bloating and diabetes | पोट फुगल्यासारखं वाटतं, गॅस पासच होत नाही? ६ पदार्थ आहारात हवेत, गॅस- पचनाचे त्रास होतील दूर

पोट फुगल्यासारखं वाटतं, गॅस पासच होत नाही? ६ पदार्थ आहारात हवेत, गॅस- पचनाचे त्रास होतील दूर

चांगल्या तब्येतीसाठी  मॉर्निंग रुटीन हेल्दी असणं गरजेचं आहे. अनेकांना सकाळी उठल्यानंतर गॅस, जळजळ, अपचनाचे त्रास उद्भवतात. तब्येत चांगली राहण्यासाठी पोट साफ राहणंसुद्धा तितकंच महत्वाचं असतं. हेल्दी ड्रिंक्स पिऊन तुम्हाला गॅस, डायबिटीससारख्या गंभीर समस्यांपासून आराम मिळू शकतो. (Health Tips) हे ड्रिंक्स पोटासाठीही फायदेशीर असतात. डायटिशिन मानसी यांच्यामते सकाळची सुरूवात पाणी पिऊन करायला हवी.

पोटात  गॅस झाल्यास भयंकर वेदना  जाणवतात आणि कधी कधी तो त्रास मेंदूपर्यंत जातो. यापासून सुटका मिळवण्यासाठी मनुके पाण्यात टाकून रोज रात्री झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी याचे सेवन करा. (Best morning drinks for everyday to cure constipation  bloating and diabetes)

ग्लोईंग स्किन 

चमकदार त्वचा मिळवायची असेल तर केशराचे पाणी प्या. यात अँटी-पिंपल्स, फ्रिकल्स आणि अँटी-रिंकल गुणधर्म आहेत. रात्री एक ग्लास पाण्यात थोडेसे केशर टाका आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी प्या.

डायबिटीससाठी मेथीचं पाणी

मेथीच्या दाण्यांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. एक चमचा मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात टाकून रात्रभर ठेवा. सकाळी सर्वप्रथम याचे सेवन करा. तुमची रक्तातील साखर नियंत्रणात राहील.

प्रेग्नंसीनंतर वाढलेलं बेली फॅट झटपट कमी होईल; तज्ज्ञांनी सांगितल्या ५ टिप्स; आकर्षक दिसेल बांधा

मजबूत हाडांसाठी चिया सिड्सचं पाणी

जर तुमच्या हाडांमध्ये वेदना असेल तर ते अशक्तपणाचे लक्षण आहे. ते दूर करण्यासाठी चिया सिड्स फायदेशीर ठरतात. हे  पेय बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा चिया सिड्स टाकून सकाळी प्या.

बद्धकोष्ठतेसाठी जर्दाळू

बद्धकोष्ठतेवर उपचार करणे आवश्यक आहे, अन्यथा ते मूळव्याध किंवा फिशरचे रूप घेऊ शकते. जर्दाळूमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते. रात्री एक ग्लास पाण्यात टाका आणि सकाळी उठून ते प्या.

चहासोबत खाण्यासाठी करा खमंग-कुरकुरीत डाळ पापडी, इन्स्टंट -पौष्टिक -चटकदार रेसिपी

हालीमचे पाणी

लोहाच्या कमतरतेमुळे रक्ताचे प्रमाण देखील कमी होऊ शकते. ते लगेच दूर करण्यासाठी हलीमचे पाणी पिण्यास सुरुवात करा. हे पेय बनवण्यासाठी एक चमचा हलीमच्या बिया रोज घ्या.

Web Title: Best Morning Drinks : Best morning drinks for everyday to cure constipation bloating and diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.