Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > छातीत खूप कफ झाला, सतत खोकला, घसा सुजला? ६ उपाय- कफ होईल कमी

छातीत खूप कफ झाला, सतत खोकला, घसा सुजला? ६ उपाय- कफ होईल कमी

Best Natural Cough Remedies and Prevention Tips : थंड खाल्ल्यामुळे किंवा उन्हाळ्याच्या दिवसात पाऊस पडल्यानं वातावरणात बदल झाल्यास लगेच सर्दी, खोकला होतो किंवा घश्याला सूज येते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 12:33 PM2023-05-30T12:33:49+5:302023-05-30T14:59:05+5:30

Best Natural Cough Remedies and Prevention Tips : थंड खाल्ल्यामुळे किंवा उन्हाळ्याच्या दिवसात पाऊस पडल्यानं वातावरणात बदल झाल्यास लगेच सर्दी, खोकला होतो किंवा घश्याला सूज येते.

Best Natural Cough Remedies and Prevention Tips : How to get rid from cough | छातीत खूप कफ झाला, सतत खोकला, घसा सुजला? ६ उपाय- कफ होईल कमी

छातीत खूप कफ झाला, सतत खोकला, घसा सुजला? ६ उपाय- कफ होईल कमी

बदलत्या वातावरणात इम्यून सिस्टिम कमकुवत झाल्यानं शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता कमी होते. यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडता. सर्दी, खोकल्याचा त्रास सध्या कोणत्याही ऋतूत उद्भवतो. थंड खाल्ल्यामुळे किंवा उन्हाळ्याच्या दिवसात पाऊस पडल्यानं वातावरणात बदल झाल्यास लगेच सर्दी, खोकला होतो किंवा घश्याला सूज येते. (How to get rid from cough)

खोकला वेळीच बरा झाला नाही तर तापही येऊ शकतो आणि ओव्हरऑल कामावर याचा परीणाम होतो. खोकला झाला की सतत  गोळ्या घेण्यापेक्षा काही घरगुती उपाय अधिक फायदेशीर ठरू शकतात. डॉक्टर चैताली राठोड यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Best Natural Cough Remedies and Prevention Tips)

हळद

हळदीत अनेक औषधी, आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत. इम्यूनिटी बुस्टर आणि सतत होणारा खोकला रोखण्यासाठी हळद फायदेशीर ठरते, एंटी कॅन्सर आणि एंटी इंफ्लेमेटरी गुणांमुळे खोकल्यावर हळद फायदेशीर ठरते.

आलं

सुकलेलं आलं कफ दोष संतुलित ठेवण्याचा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे कफ बाहेर निघण्यास मदत होते. मधासह आलं मिसळून दिवसातून २ ते ३ वेळा याचे सेवन करा. 

लवंग

लवंग घश्याची खवखव दूर करण्याचा एक उत्तम पर्याय आहे. जेव्हाही तुम्हाला घशात खवखव, खोकला जाणवत असेल तेव्हा लवंग चावून घ्या किंवा लवंग भाजूनही तुम्ही खाऊ शकता.

काळी मिरी

काळी मिरी सर्दी-खोकल्यावर उत्तम उपाय आहे. काळ्या मिरीचे हळद आणि सुंठासह मिसळून सेवन केल्यास तब्येत चांगली राहते. याचा उपयोग तुम्ही चहामध्येही करू शकता. चहा उकळताना त्यात काळी मिरी घातल्यास घश्याला आराम मिळेल. 

आवळा

आवळ्यात व्हिटामीन सी असते. जे रक्तातील रक्तपरिसंचयण वाढवते. यात एंटी ऑक्सिडेंट्सही असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. 

मध, लिंबू आणि वेलचीचं मिश्रण

अर्धा चमचा मधात एक चिमुटभर वेलची पावडर आणि काही थेंब लिंबाचा रस घाला. या सिरपचे दिवसातून २ वेळा सेवन केल्यानं खोकला- सर्दीच्या त्रासापासून आराम मिळेल. 

Web Title: Best Natural Cough Remedies and Prevention Tips : How to get rid from cough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.