Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > शरीरात वाढेल उर्जा, मसल्स होतील स्ट्राँग, फक्त रोज एक प्रोटीन बार खा, पाहा प्रोटीन बार करण्याची सोपी कृती

शरीरात वाढेल उर्जा, मसल्स होतील स्ट्राँग, फक्त रोज एक प्रोटीन बार खा, पाहा प्रोटीन बार करण्याची सोपी कृती

Best protein bars for weight loss and energy : छोटी भूक भागवण्यासाठी अरबट-चरबट खाऊ नका, रोज खा एक प्रोटीन-बार, वाढेल उर्जा-वजन होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2023 02:20 PM2023-11-12T14:20:15+5:302023-11-12T14:25:01+5:30

Best protein bars for weight loss and energy : छोटी भूक भागवण्यासाठी अरबट-चरबट खाऊ नका, रोज खा एक प्रोटीन-बार, वाढेल उर्जा-वजन होईल कमी

Best protein bars for weight loss and energy | शरीरात वाढेल उर्जा, मसल्स होतील स्ट्राँग, फक्त रोज एक प्रोटीन बार खा, पाहा प्रोटीन बार करण्याची सोपी कृती

शरीरात वाढेल उर्जा, मसल्स होतील स्ट्राँग, फक्त रोज एक प्रोटीन बार खा, पाहा प्रोटीन बार करण्याची सोपी कृती

प्रोटीन (Protien) शरीरासाठी आवश्यक असते. प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पण प्रोटीन फक्त हेल्दी पदार्थांमध्ये आढळतात. हेल्दी स्नॅक्सचे पदार्थ फार कमी आहे, ज्यात प्रोटीन असते. इतर स्नॅक्स पदार्थांमधून आपल्याला आवश्यक पोषक घटक मिळत नाही. शिवाय गोड पदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे वजन वाढते. अशा वेळी छोटी भूक भागवण्यासाठी काय खावे असा प्रश्न पडतो.  पण जर आपल्याला गोड आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खायचं असेल तर, घरच्या घरी प्रोटीन बार तयार करा.

यासंदर्भात पोषणतज्ज्ञ शिखा अग्रवाल सांगतात, 'जर आपल्याला हेल्दी व टेस्टी पदार्थ खायचं असेल तर, आपण घरी प्रोटीन बार तयार करून खाऊ शकता. यामुळे वजन तर कमी होतेच शिवाय, मसल्स स्ट्राँग होतात'(Best protein bars for weight loss and energy).

प्रोटीन बार तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

सकाळी व्यायाम-डाएट करायला वेळ मिळत नाही? झोपण्यापूर्वी पाण्यात मिसळून प्या स्वयंपाकघरातील १ गोष्ट, झरझर घटेल वजन

एक कप पिनट बटर

अर्धा कप मध

२ कप ओट्स

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप पिनट बटर आणि अर्धा कप मध घेऊन मिक्स करा. ५ ते ८ मिनिटं चमच्याने सतत मिक्स करत राहा. नंतर त्यात २ कप ओट्स घालून साहित्य एकजीव करा. नंतर एका भांड्याला बटर पेपर लावून घ्या, व त्यात तयार मिश्रण ओतून चमच्याने एकसमान दाबून घ्या. नंतर हे भांडं फ्रिजमध्ये १ ते २ तासांसाठी सेट करण्यासाठी ठेवा. मिश्रण सेट झाल्यानंतर त्याच्या लांब आकारामध्ये वड्या कापून घ्या. अशा प्रकारे प्रोटीन बार खाण्यासाठी रेडी.

पिनट बटर खाण्याचे फायदे

पिनट बटर हे शेंगदाण्यापासून तयार केलेले एक अनप्रोसेस्ड फूड आहे. त्यात प्रथिने, हेल्दी फ़ॅट्स आणि फायबर आढळते. शिवाय त्यात व्हिटॅमिन ई, नियासिन, फोलेट आणि मॅग्नेशियम सारखी महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. शेंगदाण्यामध्ये आढळणारे मोनो अनसॅचुरेटेड फ़ॅट्स शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. शिवाय फ़ॅट्स कमी करण्यास मदत करतात.

मध

मधामध्ये ग्लुकोज आणि फ्रक्टोज असतात, ज्यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. मध हे अँटिऑक्सिडंटचा उत्तम स्रोत आहे, जे मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे घसादुखीपासून आराम मिळतो. नियमित आहारात मधाचा वापर केल्याने पचनक्रिया सुधारते, व बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

दिवाळीपूर्वी वजन कमी करायचंय? आजपासून तातडीने खा ५ पदार्थ, वजन घटेल आणि चेहऱ्यावरही येईल चमचमता ग्लो

ओट्स

ओट्समध्ये उत्तम प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्यात बीटा-ग्लुकन नावाचा एक विशेष प्रकारचा फायबर असतो, ज्यामुळे हृदयाच्या निगडीत समस्या निर्माण होत नाही. शिवाय बॅड कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोट भरलेले राहते आणि भूक नियंत्रित राहते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

Web Title: Best protein bars for weight loss and energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.