प्रोटीन फक्त आपल्या मासपेशींनाच मजबूत बनवत नाही तर शरीराला एक्टिव्ह ठेवण्यासाठीही फायदेशीर ठरतं. फक्त अंडी, मासे यांमधून मोठ्या प्रमाणावत प्रोटीन मिळतं असा लोकांचा समज असतो. आरोग्य तज्ज्ञसुद्धा व्हेजिटेरिन लोकांच्या शरीरातील प्रोटीन्सच्या कमतरतेबाबत चिंता व्यक्त करत आहेत.(What vegetarian foods are high in protein?) प्रोटिन्सच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. प्रोटिन्सच्या कमतरेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे. (5 Best Protein Sources for Vegetarians)
म्हणूनच या लेखात तुम्हाला ५ अशा शाकाहारी पदार्थांबाबत सांगणार आहोत. ज्याच्या सेवनानं तुमच्या शरीरातील प्रोटीन्सची कमतरता दूर होऊ सकते. हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार मासाहारांपेक्षा काही शाकाहारी पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात प्रोटिन्स असतात. (How do vegetarians get protein)
डाळी
व्हेज प्रोटिनबाबत बोलायचं झाल्यास डाळी या सगळ्यात उत्तम स्रोत आहेत. स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असलेल्या डाळी खाल्ल्यानं शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळते. एक कप शिजवलेल्या डाळीत जवळपास १७.८६ ग्राम प्रोटीन असते. यात पोटॅशियम, फायबर आणि फोलेट्सचे प्रमाणही जास्त असते.
हा' त्रास असलेल्यांनी रात्री चुकूनही दूध पिऊन झोपू नये; तब्येत कधी खराब होईल कळणारही नाही
चणे
शरीरात प्रोटीन्सची कमतरता दूर करण्यासाठी चण्यांचा समावेश असणं आवश्यक आहे. एक कप उकळलेल्या चण्यांमध्ये जवळपास १४.५३ ग्राम प्रोटीन असते. चणे चवीला चांगल्या असतातच पण त्यात कार्बोहायड्रेट्स, अनसॅच्यूरेडेट फॅटी एसिड्स सारखे पोषक तत्वही असतात. सूप, भाज्या, पीठांच्या स्वरूपात तुम्ही चण्याचा वापर आहारात करू शकता
शेंगदाणे, बदाम
प्रोटीनसाठी शाकाहारी लोक शेंगदाणे आणि बदामाचे सेवन करतात. अर्धा कप शेंगदाण्यांमध्ये २०.५ ग्राम प्रोटीन असते. अर्धा कप बदाम खाल्ल्यानं शरीराला १६.५ ग्राम प्रोटीन मिळते.
मूग
मूगात लोह आणि फायबर्ससह प्रोटिन्सचे प्रमाणही भरपूर असते. एक कप शिजवलेल्या मुगात १४.१८ ग्रम प्रोटिन असते. मूगाचा समावेश सकाळच्या नाश्त्यात केल्यास शरीराला भरपूर फायदे मिळतात.
फळभाज्या
फळभाज्या म्हणजेच राजमा, शेंगयुक्त भाज्या या प्रोटिन्सचा उत्तम स्त्रोत आहेत. एक कप फळ भाज्यांमध्ये १२ ते १५ ग्राम प्रोटिन असते. याशिवाय या भाज्यांमध्ये पोटॅशियम आणि फायबर्सही मुबलक प्रमाणात असतात.