Join us   

सतत ॲसिडिटी-गॅसेस-करपट ढेकरही येतात? ‘ही’ २ औषधे - पोटाच्या आजारांवर उत्तम उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2024 5:40 PM

Best remedy for digestive problems Dipya ayurvedic tablets : बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना पित्त-गॅसेसचा त्रास होतो, त्यासाठीच हा खास

मला सतत ॲसिडिटी होते, करपट ढेकर येतात, गॅस होतो आणि कितीही ॲण्टासिड घेतले तरी हे आजार बरेच होत नाही? असे का होत असेल? काय उपाय केला तर त्रास कमी होईल?

-निता पाटील

ही समस्या आजकाल अगदी तरुण मुलं ते आजीआजोबांपर्यंत सर्वांना छळते आहे. जीवनशैलीच अशी बदलली आहे की जेवणाच्या वेळा नक्की नाही. इच्छा असूनही व्यायामाला वेळच मिळत नाही. कामाचे तास वाढले आहे, बैठं काम आहे आणि खाण्यापिण्यात तेलकट-मसालेदार आणि जंक फूडचं प्रमाणही जास्त आहे. झोप कमी. रात्रीची जागरणं हे कारणही आहे. थोडक्यात काय तर आपली जीवनशैलीच अशी आहे की काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्याचा परिणाम म्हणून अन्न घशाशी येणं, मळमळ, पित्त, ॲसिडिटीचा सतत त्रास, करपट ढेकर येणं, अजीर्ण होणं, गॅसेसचा त्रास हे सगळं चक्र सुरु होतं. त्यामुळे अनेकांना डोकेदुखी ते उलट्या ते अगदी पोटात आग पडण्यापासून पोट दुखीपर्यंतचे त्रास होतात (Best remedy for digestive problems Dipya ayurvedic tablets).

उपाय काय?

१. हे सगळे त्रास लाइफस्टाइलशी निगडीत आहे. त्यामुळे आपला आहार कसा आहे, आपण खूप कोरडं, तेलकट, मसालेदार, जंक असं सतत खातो का हे पहायला हवे.

२. दुसरं म्हणजे पाणी किती पितो. कोरडं अन्न, पाणी कमी पिणे आणि सतत बसून काम यानंही त्रास वाढतो.

३. रात्री उशीरा जेवण करणाऱ्यांना अनेकदा पित्त आणि गॅसेसचा त्रास होतो. लवकर जेवण हा उपाय करुन पहायला हवा.

४. कोणते पदार्थ खाल्ले म्हणजे आपल्याला त्रास होतो याची यादी करुन ते पदार्थ टाळायला हवे.

५. आता अनेकांना सवय असते की पित्त वाढलं की ते लगेच मेडिकलमधून गोळ्या आणतात आणि तात्पुरत्या त्या घेतात पण त्यामुळे शरीरात वारंवार तयार होणारे पित्त कमीच होत नाही. 

६. त्यामुळे जीवनशैलीत बदल करत काही उत्तम आयुर्वेदिक उपाय करायला हवे. त्यासाठी चांगला उपचार म्हणजे दिप्या ॲसिडिटी रिलिफ टॅबलेट. ही आयुर्वेदिक ॲण्टासिड टॅबलेट आहे. अत्यंत नैसर्गिक पद्धतीने बनवण्यात आलेले आयुर्वेदिक औषध. त्यात सुतशेखर, शंख, मुक्तशुक्त, आवळा, सुवर्ण गैरिक असे अनेक उत्तम घटक आहेत. त्यामुळे ही गोळी घेतली तर ॲसिडिटी त्वरित कमी होते. 

७. अनेकांना गॅसचा त्रासही खूप होतो. करपट ढेकर येतात. ब्लोटिंग होते. आणि त्यामुळे थेट त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो की आपल्या त्रासामुळे आपलं चारचौघात हसू होईल. हा त्रास अंगावर काढणं योग्य नाही. वेळेत उपचारच व्हायला हवे. आहारात बदल करुन पचायला हलके, पातळ पदार्थ खा. आणि दोन चमचे दिवसातून दोनदा जेवणानंतर दिप्या सिरप घ्या, दिप्या आयुर्वेदिक डायजेस्टिव्ह सिरप हे या त्रासावर उत्तम औषध आहे. त्यात १९ आयुर्वेदिक घठक आहेत. द्राक्ष, जीरक, सुंठ, आवळा, शतावरी यासह आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेलं हे औषध क्लिनिकली टेस्टेड आहे. गॅसेस, ब्लोटिंग, अती ढेकर येणं या त्रासावर हे औषध घ्या. मुख्य म्हणजे सर्व वयोगटातील व्यक्ती ते घेऊ शकतात, आणि चवीलाही ते छान असल्यानं मुलंही घेऊ शकतात. 

८. गॅसेस, पित्त, अजिर्ण हे त्रास दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत त्यासाठी वेळीच औषधोपचार करा आणि तब्येत ठणठणीत ठेवा.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल