ऊन खूप वाढलं की खूप थकल्यासारखं वाटू लागतं (Summer Special). उन्हामध्ये फिरताना किंवा अगदी घरी बसलो तरी बाहेरच्या वाढत्या तापमानामुळे थकल्यासारखे जाणवते. तसेच ग्लानी पण येऊ लागते (Summer Foods). असा आळस जाणवू नये म्हणून हलके, ताजेतवाने आणि सहज पचणारे अन्न खायला हवे. ज्यामुळे आरोग्य सुदृढ राहील. शिवाय आरोग्याला कोणताही त्रास होणार नाही.
पण उन्हाळ्यात नेमका कोणता आहार घ्यावा? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल? उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून काय खावे? याचा विचार करीत असाल तर, एकदा ही लिस्ट पाहा(Best Summer Foods To Keep Your Body Cool).
ना रस - ना पेस्ट; ५ रुपयांच्या काकडीने करा फेशिअल; चेहरा करेल ग्लो - टॅनिंग होईल गायब
आहारात करा हलक्या पदार्थांचा समावेश
- आहारात भरपूर फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करणे गरजेचं आहे. कारण ते आवश्यक पोषक आणि फायबर प्रदान करतात. हे खाद्यपदार्थ शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास आणि संपूर्ण आरोग्यास समर्थन देखील देऊ शकतात.
घरात एसी नाही? टेन्शन कशाला? फॅनच्या हवेमुळेही खोली होईल थंड- विजेची देखील होईल बचत
- पालेभाज्या, काकडी, टोमॅटो यांसारख्या सॅलड खात राहा. सॉसऐवजी चव वाढवण्यासाठी औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर करा.
- काही खाद्यपदार्थांमध्ये नैसर्गिक कूलिंग गुणधर्म असतात आणि ते उष्णतेच्या लाटेत शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या आहारात काकडी, टरबूज, पुदिना, लिंबूवर्गीय फळे, दही आणि नारळ पाणी यासारख्या पदार्थांचा समावेश करा.