ऊन्हाळ्याच्या दिवसांत ऊसाचा रस पिणं तब्येतीसाठी फायदेशीर ठरतं. ऊसाच्या रसात पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स आणि आयर्न मोठ्या प्रमाणात असते. (Summer Health Tips) याशिवाय यात मॅग्नेशियम, कॅल्शियमही असते. ऊसाचा रस प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्याही उद्भवत नाहीत. (Best Time To Drink Sugarcane Juice)
थकवा, कमकुवतपणा येत नाही. ऊसाचा रस शरीराला गारवा प्रदान करतो. यामुळे डिहायड्रेशनही होत नाही. पण ऊसाचा रस पिण्याची योग्यवेळ माहीत असायला हवी. (Usacha Ras) डायटिशियन डॉक्टर सुगीता मुटरेजा यांनी ऊसाचा रस कधी, कसा प्यायला हवा याबाबत ओन्ली माय हेल्थशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. (Summer Special Best Time To Drink Sugarcane Juice)
ऊसाचा रस कधी प्यायला हवा? (What Is Best Time To drink Sugar Cane Juice)
ऊसाचा रस प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात पण योग्यवेळी प्यायल्यानंतरच त्यामुळे फायदा होतो. ऊसाचा रस दुपारी किंवा दुपार होण्याच्या आधी प्यायला हवा. याशिवाय ऊसाचा रस उभं राहून न पिता बसून प्यायला हवा. आठवड्यातून ३ ते ४ वेळा उसाचा रस प्यायल्यास शरीराला गारवा मिळतो आणि डिहायड्रेशनचा त्रासही उद्भवत नाही.
ऊसाचा रस कसा प्यायला हवा? (Right Way To Drink Sugar Cane Juice)
ऊसाचा जर नेहमी ताजाच प्यायला हवा. फ्रिजमध्ये ठेवलेला ऊसाचा रस पिणं टाळा. थंड-बराचवेळ वर काढून ठेवलेला रस प्यायल्याने तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. ऊसाच्या रसाने पोषक तत्व आणि चव वाढवण्यास मदत होते. तुम्ही त्यात पुदीना आणि लिंबाचा रसही मिक्स करू शकता काही लोक ऊसाच्या रसात काळं मीठ घालणं पसंत करतात. ऊसाच्या रसाचे सेवन केल्याने शरीराला गारवा मिळण्यास मदत होते.. अधिकाधिक फायदे मिळवण्यसाठी नेहमी फ्रेश असतानाच प्या.
या लोकांनी ऊसचा रस पिणं टाळायला हवं (How Should Not Drink Sugar Cane Juice)
खोकला-सर्दी झाल्यास उसाचा रस पिऊ नये. डोकेदुखी असल्यास उसाचा रस पिणं टाळावं. याच्या थंड प्रभावामुळे डोकेदुखी उद्भवू शकते. ऊसाचा रस पचनक्रियेसाठी चांगला असतो पण याचे अधिक सेवन केल्याने पचनक्रियेवर चुकीचा परिणाम होऊ शकता. कोलेस्ट्रोरॉल वाढल्यास ऊसाचा रस पिणं टाळायला हवं. ज्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल वाढत नाही.