Join us   

लिव्हरचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त १ भाजी; योग्य आहार-लिव्हर सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2022 3:32 PM

Best Vegetable For Good Liver Health : लिव्हरच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी आहाराकडे लक्ष देणे आवश्यक असते.

ठळक मुद्दे ब्रोकोलीमुळे लिव्हरचे डिटॉक्सिफिकेशन होत असल्याने लिव्हरचे काम चांगले चालावे यासाठी ब्रोकोली खाणे फायद्याचे ठरते. आहाराबाबत योग्य ती काळजी घेतल्यास आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. विविध प्रकारच्या भाज्या खाल्ल्यास आरोग्याला त्याचा चांगला फायदा होतो. 

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचे कार्य अतिशय महत्त्वाचे असते. लिव्हर हा शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव असून शरीरात जमा होणारे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी लिव्हर महत्त्वाचे काम करते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीविषयक चुकीच्या पद्धतींमुळे लिव्हरशी संबंधित आजारांच्या प्रमाणात वाढ होते. लिव्हरच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरु शकते. (Broccoli)या समस्या उद्भवू नयेत यासाठी आहाराकडे लक्ष देणे आवश्यक असते. यकृताचा आजारही अनुवांशिक असू शकतो (Best Vegetable For Good Liver Health). 

(Image : Google)

यकृताची समस्या विविध कारणांमुळे देखील होऊ शकते, जसे की मद्यपान आणि लठ्ठपणा. कालांतराने, यकृताला हानी पोहोचवणारी स्थिती सिरोसिसमध्ये रुपांतरीत होऊ शकते. यामुळे यकृत निकामी होण्याचा धोकाही असतो. यकृत निकामी झाल्यामुळे शरीरात अशक्तपणा येणे, भूक न लागणे, उलट्या होणे, झोप न लागणे, दिवसभर थकवा जाणवणे, शरीरातील सुस्ती, वजन झपाट्याने कमी होणे, यकृताला सूज येणे ही लक्षणे दिसू लागतात. आहाराबाबत योग्य ती काळजी घेतल्यास आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. विविध प्रकारच्या भाज्या खाल्ल्यास आरोग्याला त्याचा चांगला फायदा होतो. 

(Image : Google)

अनेकदा आपण मेथी, पालक, दुधी भोपळा, लाल भोपळा, कारलं यांसारख्या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात म्हणून खातो. पण ब्रोकोलीसारख्या थोड्या वेगळ्या प्रकारची भाजी आपण क्वचितच खातो. मात्र ब्रोकोलीचा आहारात नियमितपणे समावेश करायला हवा. ब्रोकोलीमुळे लिव्हरचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. ब्रोकोलीमुळे लिव्हरचे डिटॉक्सिफिकेशन होत असल्याने लिव्हरचे काम चांगले चालावे यासाठी ब्रोकोली खाणे फायद्याचे ठरते. लिव्हरसाठी आवश्यक असणारे काही घटक कोलीफ्लॉवर, कोबी यांसारख्या भाज्यांमध्येही असतात. ब्रोकोलीपासून सूप, भाजी, पुलाव असे वेगवेगळे पदार्थ करता येतात. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नभाज्या