Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री भात खाल्ल्याने डायबिटीस वाढते का? डॉक्टर सांगतात 'या' पद्धतीने शिजवा भात, डायबिटीस राहील दूर

रात्री भात खाल्ल्याने डायबिटीस वाढते का? डॉक्टर सांगतात 'या' पद्धतीने शिजवा भात, डायबिटीस राहील दूर

Best Way To Cook Rice If You Are Diabetic Patient : भात खाल्ल्यानंतर थोडावेळ चालणं गरजेचं आहे. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल कमी होण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 07:21 PM2024-03-07T19:21:41+5:302024-03-08T13:09:03+5:30

Best Way To Cook Rice If You Are Diabetic Patient : भात खाल्ल्यानंतर थोडावेळ चालणं गरजेचं आहे. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल कमी होण्यास मदत होते.

Best Way To Cook Rice If You Are Diabetic Patient dr Manan Vora Shared A Healthy Rice Cooking Hack | रात्री भात खाल्ल्याने डायबिटीस वाढते का? डॉक्टर सांगतात 'या' पद्धतीने शिजवा भात, डायबिटीस राहील दूर

रात्री भात खाल्ल्याने डायबिटीस वाढते का? डॉक्टर सांगतात 'या' पद्धतीने शिजवा भात, डायबिटीस राहील दूर

डायबिटीस (Diabetes) हा एक असा आजार आहे जो एकदा झाल्यानंतर आयुष्यभर या आजाराचा सामना करावा लागतो. लाईफस्टाईलशी निगडीत असलेला हा आजार एक सायलेंट किलर आहे. या आजारामुळे तुमची तब्येतही बिघडू शकते. (Diabetes Control Tips) नेहमीच भातापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.

भारतात  राहणाऱ्या लोकांसाठी भात खाणं सोडणं कठीण आहे. इंडियन डिशेसमध्ये भाताला भरपूर महत्व आहे, डॉक्टरांच्या मते भात खाणं पूर्णपणे  सोडण्यापेक्षा भात खाण्याच्या पद्धतीत थोडाफार बदल करायला हवा. (Best Way To Cook Rice If You Are Diabetic Patient)

नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार पांढरा भात खालल्ल्याने डायबिटीसचा धोका वाढतो. २१ देशांच्या मोठ्या बहुराष्ट्रीय अभ्यासात दिसून आले की भात  जास्त प्रमाणात खाणे डाबिटीसच्या धोक्याशी संबंधित आहे. यामुळे शुगर लेव्हलवरही परिणाम होतो. दक्षिण पूर्व आशिया, मध्य पूर्व, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, युरोप-आफ्रिका या देशात भाताचे जास्तीत जास्त सेवन केले जाते.

डायबिटीसच्या रुग्णांनी भाताचे सेवन कसे करावे? (Right Way To Eat Rice)

डॉ. मनन वोहरा यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे.  तुमच्याघरी कोणला डायबिटीस आहे आणि त्यांना भात कमी खा किंवा नका खाऊ असं सांगण्यात आलं आहे का? यात कितपत तथ्य आहे? इंडियन मिल्स भाताशिवाय अपूर्ण आहे. डायबिटीसचे रुग्णही भात खाऊ शकतात की नाही त्याबाबत मी तुम्हाला सांगणार आहे. तांदूळाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच जास्त असतो. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल सहज स्पाईक होते. हा एक उत्तम उपाय आहे.

१) भात शिजवण्याची योग्य पद्धत म्हणजे कुकरऐवजी मोकळ्या भांड्यात भात शिजवा. भात गरजेपेक्षा जास्त शिजवू नका भातातील एक्स्ट्रा पाणी काढून टाका. जेणेकरून त्यातील स्टार्च कंटेट कमी होईल.

दूध प्यायची सवयच नाही-कॅल्शियम कसं मिळणार? रोज ५ पदार्थ खा, हाडांना मिळेल भरपूर कॅल्शियम

२) याव्यतिरिक्त राईस मिल्स फायबर्स आणि प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत आहेत. यात तुम्ही अंडी, पनीर, दही आणि  ताज्या भाज्या मिसळून खाऊ शकता. 

३) जर तुमच्या फॅमिली मेंबर्सला डायबिटीस असेल तर तुम्ही भात खाण्याची फ्रिक्वेंसी कमी करू करू शकता पण भात खाणं पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही.

कोण म्हणतं प्रोटीन महाग असतं? ६ पदार्थ खा-रस्त्यावर मिळेल १० रूपये वाटा, मसल्स होतील मजबूत

४) भात खाल्ल्यानंतर थोडावेळ चालणं गरजेचं आहे. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल कमी होण्यास मदत होते.

५)  जवळपास  ९ ते १० तास आधी शिजवून थंड केलेला भातही तुम्ही खाऊ शकता. ताज्या भाताच्या तुलनेत हा भात अधिक पौष्टीक असतो. 

Web Title: Best Way To Cook Rice If You Are Diabetic Patient dr Manan Vora Shared A Healthy Rice Cooking Hack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.