Join us   

रोजच्या जगण्यात फक्त ४ सवयी बदला, आयुष्य वाढेल-वय वाढल्याची एकही खूप अंगावर दिसणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2023 4:03 PM

Best way to live longer : एका रात्रीत फिट होता येत नाही तसं आयुष्यही वाढत नाही, लाइफस्टाइल बदलायची तयारी हवी.

दीर्घायुष्य मिळावं अशी प्रत्येकाचीच इच्छ असते. यात  डाएट आणि फिजिकल एक्टिव्हीजचा मोठा रोल असतो. हेल्दी आणि फिट राहण्यासाठी लोकांनी मॉर्निंग आणि बेड टाईम रूटीनवर विशेष लक्ष द्यायला हवं. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपल्यानंतर  काही सवयी पाळल्यानंतर शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते. (Habits to Form Now for a Longer Life)

तुम्ही दुपारच्या वेळी काय करता हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. दुपारच्यावेळी हेल्दी हॅबिट्स फॉलो केल्या तर तुम्ही दीर्घकाळ तुम्ही तरूण राहू शकाल. दुपारच्यावेळी तुम्ही कामात व्यस्त असाल तरी काही सवयी तुमचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतील. (Best way to live longer according to scientist 5 healthy habbits for long life)

१) जेवणाकडे लक्ष द्या

दुपारच्यावेळी तुम्ही ऑफिसमध्ये असाल तरी कामाकडे लक्ष न देता नेहमी जेवणाकडे लक्ष द्या.  जास्त काम असल्यामुळे तुम्ही लवकर काम संपवण्याच्या विचारात असाल तर जेवणावर लक्ष केंद्रीत करता येणार नाही. घरातल्या किंवा ऑफिसच्या कोणत्याही कामाचं टेंशन घेऊ नका. मोठं काम लवकर संपवण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्ही आनंदी राहाल.

२) चालण्यासाठी वेळ काढा

पूर्ण दिवस बसून राहिल्यामुळे तुम्हाला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. म्हणून काम करताना चालण्यासाठीसुद्धा वेळ काढा. यादरम्यान वॉक करणं किंवा कामादरम्यान कोणत्याही गेम एक्टिव्हीजमध्ये भाग घ्या. जास्त व्यस्त असाल तर कमीत कमी चालण्यासाठी तरी वेळ काढा.

३) सोशलाईज राहा

जास्त जगण्यासाठी सोशलाईज असणं सुद्धा तिकतंच महत्वाचं आहे. माणूस हा एक समाजशील प्राणी आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य  चांगले राहण्यासाठी दुपारी सहकर्मचाऱ्यांबरोबर लंच करा, आणि किंवा मित्र मैत्रिणींना कॉल करा. एकटं राहिल्याचा तुमच्या मानसिक आरोग्याबरोबरच शारीरिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो. 

४) दुपारी एक नॅप घ्या

दुपारच्या वेळेला  झोप येणं स्वाभाविक आहे. अशावेळी फ्रेश राहण्यासाठी तुम्ही कामादरम्यान ५ ते १० मिनिटांची एक नॅप घ्या. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहील. यामुळे थकवा  येणार नाही आणि तुम्हाला फ्रेश वाटेल. काम करताना झोप येणार नाही.