Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Best Ways to Cool Room Without Ac : उन्हाळ्यात एसी, कुलर नसेल तरीही घर राहील थंडगार; ४ ट्रिक्स वापरा, घरात नेहमी राहील गारवा

Best Ways to Cool Room Without Ac : उन्हाळ्यात एसी, कुलर नसेल तरीही घर राहील थंडगार; ४ ट्रिक्स वापरा, घरात नेहमी राहील गारवा

Best Ways to Cool Room Without Ac : पंखा वापरणे चांगले, कारण त्यात वीज कमी लागते आणि त्यामुळे पर्यावरणाची फारशी हानी होत नाही. छतावरील पंख्यामुळे खोलीतील एकूण तापमान कमी होत नाही पण पंखे प्रामुख्याने वाईंड चिल इफेक्टद्वारे काम करतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 05:23 PM2022-04-27T17:23:28+5:302022-04-27T17:49:04+5:30

Best Ways to Cool Room Without Ac : पंखा वापरणे चांगले, कारण त्यात वीज कमी लागते आणि त्यामुळे पर्यावरणाची फारशी हानी होत नाही. छतावरील पंख्यामुळे खोलीतील एकूण तापमान कमी होत नाही पण पंखे प्रामुख्याने वाईंड चिल इफेक्टद्वारे काम करतात.

Best Ways to Cool Room Without Ac : How to cool down house with fans | Best Ways to Cool Room Without Ac : उन्हाळ्यात एसी, कुलर नसेल तरीही घर राहील थंडगार; ४ ट्रिक्स वापरा, घरात नेहमी राहील गारवा

Best Ways to Cool Room Without Ac : उन्हाळ्यात एसी, कुलर नसेल तरीही घर राहील थंडगार; ४ ट्रिक्स वापरा, घरात नेहमी राहील गारवा

दिवसेंदिवस वातावरणातील उष्णता जास्तच वाढत आहे. कधी एकदा पावसाळा सुरू होतंय असं झालंय पण अख्खा मे महिना गरमीचा त्रास सहन करावा लागणार आहे. (Summer Special Tips)  कडक उन्हातून परत आल्यावर एसी खाली बसून काहीतरी थंडगार प्यावेसे वाटते. पण प्रत्येकाच्याच घरी एसी, कुलर असतो असं नाही. (Best Ways to Cool Room Without Ac) अनेकांना एसीची सवय लावून घ्यायची नसते. तर काहींना कुलरमध्ये पैसे घालवणं योग्य वाटत नाही.  एसी , कुलर नसतानाही पंख्याच्या हवेनं तुम्ही दिवसभर घर थंडगार ठेवू शकता. त्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आणि टिप्स लक्षात घ्यायला हव्यात. (How to cool down house with fans)

पंखा वापरणे चांगले, कारण त्यात वीज कमी लागते आणि त्यामुळे पर्यावरणाची फारशी हानी होत नाही. छतावरील पंख्यामुळे खोलीतील एकूण तापमान कमी होत नाही पण पंखे प्रामुख्याने वाईंड चिल इफेक्टद्वारे काम करतात. यामुळे पंख्याची हवा तुमचा घाम लवकर सुकवते आणि  थंडावा जाणवतो. (Tricks to Cool Down a Room and Sleep in the Heat)  आजकाल स्मार्ट पंखे देखील परवडणाऱ्या किमतीत बाजारात उपलब्ध आहेत, जे स्वतःचे योग्य तापमान राखतात. असे पंखे तापमान आणि आर्द्रतेनुसार आपोआप गती नियंत्रित करून ऊर्जा वाचवतात.

१) काऊंटर क्लॉकवाईज पंखा चालवा

उन्हाळ्यात  AC सारखा थंडावा खोलीत मिळू  शकत नाही, परंतु पंखे तुम्हाला थंड ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात तुमचा पंखा घड्याळाच्या उलट दिशेने फिरेल याची खात्री करा. यामुळे खोलीतील दमट आणि गरम हवा बाहेर पडते आणि ती हवा सरळ खाली ढकलते आणि त्या वाऱ्याच्या थंडीचा प्रभाव निर्माण होतो.

उन्हामुळे चेहरा काळपट, खराब झालाय? फक्त शिळा भात या पद्धतीनं वापरून मिळवा ग्लोईंग त्वचा

२) एग्जॉस्ट फॅनचा वापर

अनेक  स्वयंपाकघरात एग्जॉस्ट फॅन असतो, जो, तेल, गॅस इत्यादींचा धूर बाहेर काढण्याचे काम करतो. जर तुमच्या स्वयंपाकघरात एक्झॉस्ट फॅन असेल तर तुम्ही स्वयंपाक केल्यानंतर किंवा काही वेळ स्वयंपाकघरात काम केल्यानंतर तो लावा आणि सुमारे 30-45 मिनिटे चालू ठेवा. यामुळे तुमच्या स्वयंपाकघरातील उष्णताही बाहेर पडेल आणि जर तुमच्या खोलीत उष्णता निर्माण होत असेल तर ती बाहेर पडण्यासही मदत होते, त्यामुळे खोलीत गरम हवा येत नाही.

३) एक्स्ट्रा कुलिंग इफेक्टसाठी बर्फाचा वापर

 थंड प्रभावासाठी बर्फ देखील वापरू शकता. जर तुम्हाला खरच उष्णतेपासून त्वरित आराम मिळवायचा असेल, तर तुम्ही एका मोठ्या भांड्यात भरपूर बर्फ टाकू शकता आणि नंतर तो टेबल फॅन किंवा टॉवर फॅनसमोर धरू शकता. यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल आणि गरमीच्या वातावरणातही तुम्ही थंड राहाल.  हा उपाय एक तात्पुरता प्रभाव असू शकतो, जो तुम्हाला थंडपणा प्रदान करण्यास मदत करेल.

४) पंखा आणि खिडकी दोन्ही उघडे ठेवा

तुम्ही खोलीत कोणीही नसताना पंखा बंद करा आणि पंखा सुरू करताना काही मिनिटे खिडकी उघडा, जेणेकरून खोलीतील उबदार हवा बाहेर पडेल आणि बाहेरच्या थंड हवेमुळे थोडा आराम मिळेल. 

Web Title: Best Ways to Cool Room Without Ac : How to cool down house with fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.