Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वजन कमी करण्यासाठी अळशीच्या बिया खाताय ? पण ते खायची योग्य पद्धत माहित आहे का ?

वजन कमी करण्यासाठी अळशीच्या बिया खाताय ? पण ते खायची योग्य पद्धत माहित आहे का ?

Right Way To Eat Flaxseeds : अळशीच्या बिया खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते, पण ते वापरताना काही छोट्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2023 02:46 PM2023-09-03T14:46:25+5:302023-09-03T15:08:45+5:30

Right Way To Eat Flaxseeds : अळशीच्या बिया खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते, पण ते वापरताना काही छोट्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी....

BEST Ways to Eat FLAXSEEDS for Weight Loss, Skin, Hair. | वजन कमी करण्यासाठी अळशीच्या बिया खाताय ? पण ते खायची योग्य पद्धत माहित आहे का ?

वजन कमी करण्यासाठी अळशीच्या बिया खाताय ? पण ते खायची योग्य पद्धत माहित आहे का ?

सध्या सगळ्यांचेच आपल्या आरोग्याकडे बारीक लक्ष असते. चांगल्या आरोग्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतो. आजकाल डाएटमध्ये आपण अनेक प्रकारच्या हेल्दी सीड्सचा समावेश करतो. अशा अनेक सीड्स आहेत, ज्यांचा आहारात समावेश केल्याने आरोग्याला फायदा होतो. यापैकी एक महत्वाचे सीड्स म्हणजे अळशीच्या बिया. आळशीच्या या बियांमध्ये कॉपर, मँगनीज, प्रोटीन, ओमेगा - ३ असिड आणि अनेक पोषक तत्वांचा समावेश आहे. त्यामुळे आरोग्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यापासून ते केसांचे, त्वचेचे सौंदर्य राखण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी अळशीच्या बिया फायदेशीर ठरतात. 

आपल्यापैकी बरेचजण सकाळी उठल्यावर अळशीच्या बिया किंवा त्यांचे पाणी पितात. परंतु आपण चांगल्या आरोग्यासाठी अळशीच्या बिया खात असू तर ते खाण्याची योग्य पद्धत (How To Eat Flax Seeds) देखील आपल्याला माहित असणे गरजेचे असते. अळशीच्या बिया किंवा त्यांची पावडर खाताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते, जेणेकरून त्याचा पुरेपूर फायदा आपल्या आरोग्याला होऊ शकतो. अळशीच्या बिया आपल्या आरोग्यासाठी जितक्या चांगल्या आहेत तितक्याच त्या योग्य पद्धतीने खाणे गरजेचे असते. अळशीच्या बिया चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो(BEST Ways to Eat FLAXSEEDS for Weight Loss, Skin, Hair).

अळशीच्या बिया खाताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ? 

१. अळशीच्या बिया भाजून घ्याव्यात :- आपल्यापैकी काहीजण अळशीच्या बिया भाजून किंवा कच्च्याच खातात. आपण अळशीच्या बिया दोन्ही प्रकारे खाऊ शकतोच. याउलट जर आपल्याला अळशीच्या बियांमधील पोषकतत्त्वे टिकवून ठेवायची असतील, तर अळशीच्या बिया मंद आचेवर भाजून घ्याव्यात. जेव्हा आपण अळशीच्या बिया मंद आचेवर भाजून घेतात, तेव्हा अळशीच्या बियांमधील पोषणद्रव्ये अधिक काळ टिकून राहतात.

पोट आणि कंबरेचा घेर कमीच होत नाही ? रोज १० मिनिटे करा ६ गोष्टी...

२. अळशीच्या बियांची पावडर करून खावी :- आपण काहीवेळा अळशीच्या बिया अशाच कच्च्या खातो. अळशीच्या बिया कच्च्या खाण्यापेक्षा त्यांची पावडर करून खाणे योग्य आहे. अळशीच्या बियांची पावडर बनवून ती एका काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवावी. ही बारीक करून स्टोअर केलेली पूड आपण खाण्यासाठी वापरु शकतो. 

मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...

३. मर्यादित प्रामाणात खा :- अळशीच्या बियांमध्ये अनेक पोषक घटक असतात यात शंका नाही. परंतु आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की त्यांची कॅलरी संख्या खूप जास्त असते. सुमारे एक टेबलस्पून अळशीच्या बियांमध्ये सुमारे ३७ इतक्या कॅलरीज असतात. म्हणून, जेव्हा तुम्ही अळशीच्या बिया जास्त प्रमाणात खाता तेव्हा ते तुमच्या कॅलरीजची संख्या कमी करते. इतकेच नाही तर अळशीच्या बियांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अंगाला - पायांना सूज येणे, पोट फुगणे आणि इतर अनेक समस्या होऊ शकतात. आपण दिवसभरात फक्त १ ते २ चमचे अळशीच्या बिया खाऊ शकता.

फॅट टू फिट प्रवासात शहनाज गिल सकाळी प्यायची सिक्रेट ड्रिंक, इतकं स्वस्त की कुणालाही परवडेल...

४. हायड्रेशनची काळजी घ्या :- जेव्हा आपण अळशी रोजच्या डाएटमध्ये समाविष्ट करतो तेव्हा, हायड्रेशन लेव्हलची विशेष काळजी घेतली पाहिजे. अळशीच्या  बिया खाल्ल्यानंतर बहुतेक लोकांना पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अळशीच्या बिया पाणी शोषून घेतात आणि जेलसारखी सुसंगतता तयार करतात. त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते.

वजन कमी करण्यासाठी ४ मंत्र विसरुच नका ! तापसी पन्नूच्या न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवालचा सल्ला...

Web Title: BEST Ways to Eat FLAXSEEDS for Weight Loss, Skin, Hair.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.