Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > चिमूटभर दालचिनी - चमचाभर मध, भाग्यश्री सांगते हाय बीपी नियंत्रित ठेवण्याचा उपाय

चिमूटभर दालचिनी - चमचाभर मध, भाग्यश्री सांगते हाय बीपी नियंत्रित ठेवण्याचा उपाय

Bhagyashree shares a cinnamon honey recipe to manage hypertension हाय ब्लडप्रेशरचा त्रास कमी करायचा तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, योग्य आहार - लाईफस्टाईल सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2023 04:06 PM2023-05-17T16:06:48+5:302023-05-17T16:07:51+5:30

Bhagyashree shares a cinnamon honey recipe to manage hypertension हाय ब्लडप्रेशरचा त्रास कमी करायचा तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, योग्य आहार - लाईफस्टाईल सांभाळा

Bhagyashree shares a cinnamon honey recipe to manage hypertension, read here | चिमूटभर दालचिनी - चमचाभर मध, भाग्यश्री सांगते हाय बीपी नियंत्रित ठेवण्याचा उपाय

चिमूटभर दालचिनी - चमचाभर मध, भाग्यश्री सांगते हाय बीपी नियंत्रित ठेवण्याचा उपाय

बॉलिवू़ड अभिनेत्री भाग्यश्री सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. ती आपल्या व्यायामाचे व हेल्थ संबंधित व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर करत असते. अभिनेत्रीने सोशल मिडीयावर हायपरटेन्शन म्हणजेच हाय ब्लड प्रेशर संबंधित एक व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

सध्या लोकांमध्ये हाय ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. या आजाराला बहुतांश लोकं कॉमन आजार म्हणून दुर्लक्ष करतात. या आजारात रक्ताचा दाब वाढतो, ज्यामुळे हृदयाला पंप करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. ज्यामुळे हृदयाच्या संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो(Bhagyashree shares a cinnamon honey recipe to manage hypertension, read here).

अभिनेत्रीने या आजारावर एक घरगुती उपाय शेअर केला आहे. ज्यात तिने दालचिनी व मधाचा वापर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला भाग्यश्री म्हणते, ''उच्च रक्तदाबाचा त्रास सध्या लोकांमध्ये वाढत चालला आहे. सध्या लोकं अधिक ताण - तणावाखाली जगत आहेत. ज्यामुळे साहजिक हाय ब्लड प्रेशरसारखी समस्या वाढते. यासाठी आपण दालचिनीचा वापर करून पाहू शकता.

दालचिनी तुमचा सिस्टोलिक रक्तदाब म्हणजेच उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होऊ शकतो. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे. त्यांनी आहारात दालचिनीचा समावेश करावा''.

हे ४ पदार्थ आहेत सायलेंट किलर! खाताना चविष्ट वाटतात, पण खाणार तो पस्तावणार..

दालचिनीचे सेवन कसे करायचे?

हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी करण्यासाठी आपण दालचिनीचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत दालचिनी पावडर घ्या, त्यात मध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट सकाळी रिकाम्या पोटी खा. यानंतर तुमचा सिस्टोलिक दाब कसा कमी होत आहे ते पाहा.

उन्हाळ्यात लघवी करताना जळजळ होते? तांदळाच्या पाण्याचा १ उपयोग, आग होईल कमी

दालचिनीचे प्रमाण

उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी १/४ चमचे दालचिनी पावडर घ्या. व समप्रमाणात मध मिसळा. ही पेस्ट रोज सकाळी रिकाम्या पोटी खा. ही पेस्ट खाल्ल्यानंतर ३० मिनिटे दुसरे काहीही खाऊ नका. मात्र, याचे प्रमाणापेक्षा सेवन करू नये. याने शरीराला हानी पोहचू शकते.

Web Title: Bhagyashree shares a cinnamon honey recipe to manage hypertension, read here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.