Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बिपाशा बसूच्या लेकीला असलेला हृदयाचा आजार नेमका काय आहे? तो कशाने होतो, टाळायचा कसा?

बिपाशा बसूच्या लेकीला असलेला हृदयाचा आजार नेमका काय आहे? तो कशाने होतो, टाळायचा कसा?

Bipasha Basu reveals daughter had two holes in her heart, had to undergo surgery when she was just 3 months old बिपाशा बसूच्या लेकीच्या हृदयाला छिद्र असून, त्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, हा आजार कशाने होतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2023 12:37 PM2023-08-07T12:37:53+5:302023-08-07T12:59:08+5:30

Bipasha Basu reveals daughter had two holes in her heart, had to undergo surgery when she was just 3 months old बिपाशा बसूच्या लेकीच्या हृदयाला छिद्र असून, त्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, हा आजार कशाने होतो?

Bipasha Basu reveals daughter had two holes in her heart, had to undergo surgery when she was just 3 months old | बिपाशा बसूच्या लेकीला असलेला हृदयाचा आजार नेमका काय आहे? तो कशाने होतो, टाळायचा कसा?

बिपाशा बसूच्या लेकीला असलेला हृदयाचा आजार नेमका काय आहे? तो कशाने होतो, टाळायचा कसा?

अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर यांनी १२ नोव्हेंबर, २०२२ रोजी गोंडस मुलीला जन्म दिला. या जोडप्याने तिचं नाव देवी बसु सिंह ग्रोवर ठेवलं. तिच्या मुलीची चर्चा सोशल मिडीयावर खूप झाली होती. परंतु, जेव्हा देवीचा जन्म झाला, तेव्हा तिला वेन्ट्रिकुलर सेप्टल डिफेक्ट हा आजार झाल्याचं निष्पन्न झालं.

अभिनेत्री नेहा धूपियासोबत इंस्टाग्राम लाइव्हवर बोलताना बिपाशाने यासंदर्भात माहिती दिली. ज्यात तिने मुलीच्या हृदयात दोन छेद असल्याचे सांगितले. मुलीच्या जन्माच्या ३ दिवसानंतर याची माहिती तिला मिळाली. ही माहिती तिला मिळाल्यानंतर बिपाशा व तिचा पती करण यांच्या पायाखालची जमीन सरकली(Bipasha Basu reveals daughter had two holes in her heart, had to undergo surgery when she was just 3 months old).

वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट

दिल्लीच्या राजीव गांधी कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. अजित जैन सांगतात, ''जेव्हा बाळाच्या अवयवांची रचना गर्भाशयात होते, त्याच वेळी हृदयाचीही निर्मिती होते. बाळाच्या विकासात कोणत्याही प्रकारचा दोष असेल तर त्याचा परिणाम, हृदयाला छिद्र पडणे किंवा इतर आजारांमध्ये दिसून येते. या हृदयाच्या समस्येवर शस्त्रक्रिया हाच एक इलाज आहे.''

पोट बिघडले? करपट ढेकर, गॅसेसचा त्रास? ५ सोपे उपाय, पोटातली गुडगुड होईल कमी

ही समस्या नेमकी काय आहे?

मुलाच्या हृदयात छिद्र पडण्याच्या समस्येला वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट म्हणतात. विकासादरम्यान झालेल्या दोषांमुळे हृदयात छिद्र पडते. गर्भधारणेदरम्यान, वाईट आहारामुळे बाळाच्या वाढीवर परिणाम होतो. यामध्ये हृदयाला छिद्र पडण्यापासून ते हृदयाच्या काही भागात समस्या निर्माण होऊ शकते.

रोज सकाळी उपाशी पोटी खा खोबऱ्याचे २ तुकडे, उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर - वजनही होईल कमी

दिल्लीस्थित सफदरजंग हॉस्पिटलचे डॉ. जुगल किशोर सांगतात, ''विकासादरम्यान बाळाच्या हृदयाचाही विकास होतो. हृदयाच्या विकासामध्ये चार कक्ष असतात आणि ते दोन्ही बाजूंना जोडतात. जर ते योग्यरित्या जोडले गेले नाहीत तर हृदयाच्या संबंधित समस्या उद्भवतात. पोषणाची कमतरता किंवा इतर कारणांमुळे हृदयाला छिद्र पडू शकतात.''

मधुमेह देखील आहे एक कारण

आजकाल गरोदर महिलांना टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेह होणे सामान्य झाले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर साखर नियंत्रित राहिली नाही, तर बाळाला जन्मापासूनच हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकते. स्त्रीच्या शरीरात इन्शुलिनची पातळी वाढली तर, जन्माला आलेल्या बाळाच्या विकासात अडथळा येऊ लागतो.

वाईट आहार

गरोदरपणात स्त्रिया अशा काही गोष्टी खातात किंवा पितात, जे त्यांच्या आरोग्यासाठीच नाही तर बाळासाठीही धोकादायक ठरू शकते. गर्भधारणेदरम्यान नियमितपणे मद्यपान केल्याने बाळामध्ये सीएचडीची समस्या उद्भवू शकते. हे वेंट्रिक्युलर सेप्टल दोषाशी संबंधित आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हृदयाला छिद्र पडणे किंवा इतर समस्या अनुवांशिकही असू शकतात, परंतु हे टाळण्यासाठी गर्भधारणेदरम्यान काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. 

Web Title: Bipasha Basu reveals daughter had two holes in her heart, had to undergo surgery when she was just 3 months old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.