Join us   

मुठभर काळ्या मनुका रोज खाण्याचे भरपूर फायदे, बेजार करणारे ४ आजारही राहतील दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2023 3:14 PM

Black Currant - Health Benefits, Uses and Important Facts काळ्या मनुका चवीला गोड आणि खाणंही सोपं, मुठभर मनूका तुमची तब्येत ठणठणीत ठेवू शकतात.

उत्तम आरोग्य राखण्यासाठी ड्रायफ्रुट्स खाण्याचा सल्ला मिळतो. दररोज किमान मुठभर ड्रायफ्रुट्स खावे असे सांगितले जाते. सुकामेव्यामुळे शरीरात पुरेशा प्रमाणात पोषण तत्वांचा पुरवठा होतो. काहींना ड्रायफ्रुट्समध्ये काळे मनुके खायला प्रचंड आवडतात. काळ्या मनुक्यांचा वापर अनेक पदार्थात केला जातो. काही जणांना दाताखाली गोड आवडत नाही म्हणून ते चिवडा, लाडूमध्ये मिक्स करून खातात. काळ्या मनुक्याचे अनेक फायदे आहेत. काळ्या मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. अँटी- बॅक्टेरिअल, अँटी- व्हायरल, अँटी-ऑक्सिडंट्स, व पोटॅशिअम या घटकांनी समृद्ध काळ्या मनुक्यांचा आहारात समावेश करायला हवा.

यासंदर्भात, पोषणतज्ज्ञ अपूर्वा अग्रवाल यांनी काळ्या मनुक्यांचे सेवन का करायला हवे, याबाबत त्यांनी सांगितले. याच्या सेवनाने कोणते आजार बरे होतात, याची माहिती त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे(Black Currant - Health Benefits, Uses and Important Facts).

अॅनेमियाग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर

लोहाच्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशी कमी होतात. यासह हिमोग्लोबिनची पातळीही कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्या आहारात काळ्या मनुक्यांचा समावेश करा. यामध्ये असलेले प्रोटीन, व्हिटॅमिन-बी6, व्हिटॅमिन-ई सारखे पोषक घटक, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.

उष्णता वाढली, जिभेला फोड आले आहेत? ५ घरगुती उपाय- आग आणि फोड होतील कमी

कोरड्या खोकल्यासाठी उत्तम औषध

जर आपल्याला कोरड्या खोकल्याचा त्रास आहे तर, काळ्या मनुक्यांचा नियमित सेवन करा. याचे सेवन आपण दोन प्रकारे करू शकता, पहिली म्हणजे आपण काळे मनुके रात्री भिजवून सकाळी खाऊ शकता. दुसरी म्हणजे नाश्ता केल्यानंतर मूठभर काळे मनुके खा, याचा आपल्या आरोग्यावर नक्कीच फायदा होईल.

खराब कोलेस्ट्रॉल होईल कमी

काळ्या मनुक्यांमध्ये पेक्टिन नावाचे फायबर आढळते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यासोबतच हे हृदयाच्या स्नायू आणि रक्त पेशींना नुकसान होण्यापासून वाचवते. काळ्या मनुक्यासह आपले डाएट फॉलो करा.

कायम तरुण दिसायचं तर न चुकता खा ५ पदार्थ, वय वाढल्याची खुण चेहऱ्यावर दिसणार नाहीच..

अनियमित मासिक पाळीची समस्या

ही समस्या आजकाल अधिक मुलींना भेडसावत आहे. अनियमित पाळी अनेक कारणांमुळे लांबली जाते. तज्ज्ञांकडून पाळी का वेळेवर येत नाही, याची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. सामान्य मासिक पाळी दरम्यान, अंडाशयातून अंडी सोडली जातात. या प्रक्रियेला ओव्हुलेशन म्हणतात. जर आपण या समस्येपासून जात तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळ्या मनुक्याचे सेवन करा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य