Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > नजर धुसर झाली-चष्मा नको वाटतो? तुपात हा पदार्थ मिसळून खा; दृष्टी सुधारेल-स्पष्ट दिसेल

नजर धुसर झाली-चष्मा नको वाटतो? तुपात हा पदार्थ मिसळून खा; दृष्टी सुधारेल-स्पष्ट दिसेल

How to Increase eye Power : दृष्टी वाढवण्यासाठी  तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 11:38 PM2024-09-10T23:38:16+5:302024-09-12T18:59:19+5:30

How to Increase eye Power : दृष्टी वाढवण्यासाठी  तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.

Black Paper Mix With Ghee to Increase eye Power Naturally Home Remedy To Increase Eyesight | नजर धुसर झाली-चष्मा नको वाटतो? तुपात हा पदार्थ मिसळून खा; दृष्टी सुधारेल-स्पष्ट दिसेल

नजर धुसर झाली-चष्मा नको वाटतो? तुपात हा पदार्थ मिसळून खा; दृष्टी सुधारेल-स्पष्ट दिसेल

आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये गॅजेट्सचा वापर वाढला आहे. दिवसरात्र मोबाईल लॅपटॉपमध्ये राहिल्यामुळे डोळ्यांवर चुकीचा परिणाम होतो. ज्यामुळे नजर कमकुवत होते. कमी वयात डोळे कमकुवत होणं गंभीर स्थिती उद्भवण्याचं कारण ठरू शकतं. नजर चांगली होण्यासाठी महागड्या ट्रिटमेंट्सचा आधार घ्यावा लागतो. दृष्टी वाढवण्यासाठी  तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (Black Paper Mix With Ghee to Increase eye Power Naturally Home Remedy To Increase Eyesight)

अधुनिक जीवनशैली, दीर्घकाळ स्क्रिन वापरणं, अन्हेल्दी डाएट आणि ताण-तणाव यामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. आयुर्वेद आणि घरगुती घरगुती उपायांमध्ये याचे खास महत्व आहे. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी काळी मिरीचे मिश्रण आवश्यक असते. आयुर्वेदात एक प्रभावी उपाय आहे.

डोळ्यांसाठी तुपाचे फायदे

तूप भारतीय स्वंयपाकघरातील एक महत्वाचा घटक आहे. यात व्हिटामीन ए, डी, ई आणि के असते. शरीरातील पोषणाची कमतरता दूर होते आणि सेल्सचा विकास होण्यास मदत होते. तुपाचा वापर फक्त स्वंयपाकात केला जात नाही तर आरोग्याच्या कामांसाठीही केला जातो. आयुर्वेदात याच्या उपचारांमध्ये खास स्थान दिले गेले आहे.

डोळ्यांच्या विकासासासाठी काळी मिरीचे फायदे

काळी मिरीचा उपयोग आयुर्वेदात औषधी मसाल्यांच्या स्वरूपात केला जातो. यात पिपेरिन नावाचे तत्व असते ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. शरीराची इम्यूनिटी वाढण्यास मदत होते. पोषक तत्वांची कमतरता भासत नाही.

व्हिटामीन ए डोळ्यांच्या आरोग्यांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे रेटीनाची कार्यक्षमता वाढते आणि नाईट ब्लाईंडनेसचा त्रास उद्भवत नाही. तुपात योग्य प्रमाणात व्हिटामीन ए असते ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

दीर्घकाळ स्क्रिनवर बसून काम केल्यानं डोळ्यांना थकवा येत नाही याशिवाय काळी मिरी खाल्ल्याने डोळ्यांची सूज आणि थकवा कमी होतो. या मिश्रणाने शरीराला पोषण मिळते याशिवाय चारही ठिकाणी ब्लड  फ्लो व्यवस्थित होते.  एक चमचा शुद्ध तुपात थोडी ताजी वाटलेली काळी मिरी मिसळा, रोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन  करा. हे खाल्ल्यानंतर अर्धा तास काहीच खाऊ नका यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.
 

Web Title: Black Paper Mix With Ghee to Increase eye Power Naturally Home Remedy To Increase Eyesight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.