Join us   

Bloating Remedy : जेवल्यानंतर लगेच पोट फुगल्यासारखं वाटतं? वारंवार उद्भवणारं गॅस, अपचन टाळण्यासाठी 'हे' घ्या सोपे उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 11:56 AM

Bloating Remedy : किचनमध्ये सहज उपलब्ध असणार्‍या औषधी वनस्पतींमुळे पोट फुगणे किंवा गॅस होण्यापासून सुटका मिळू शकते.

आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पोट फुगणे किंवा गॅस जाणवतो. जेवल्यानंतर पोटात गॅस अडकल्याची भावना खूप अस्वस्थ करते. गॅस ही एक सामान्य पचन समस्या आहे, जी काही काळ टिकते आणि कधीकधी स्वतःच बरी होते. (Diagestion Issues) मात्र, जेवणानंतर पोटात गॅस निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतु जर ते जास्त झाले तर ते वेदनादायक ठरू शकते. योग्य आहार दिनचर्या न पाळणे, वेळेवर न खाणे, जास्त प्रमाणात द्रवपदार्थ घेणे, अनहेल्दी पदार्थांचे सेवन करणे ही कारणं पोटात अधिक वायू निर्माण करतात. (bloating remedy at home)

काही औषधांच्या मदतीने या समस्येपासून तात्पुरता आराम मिळू शकतो, पण दीर्घकाळ यापासून मुक्ती मिळवायची असेल तर आयुर्वेदापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. किचनमध्ये सहज उपलब्ध असणार्‍या औषधी वनस्पतींमुळे पोट फुगणे किंवा गॅस होण्यापासून सुटका मिळू शकते. येथे काही औषधी वनस्पती आहेत ज्या आपण आपल्या आहारात समाविष्ट करू शकता.

कोथिंबीर

ज्यांना सतत  गॅसचा त्रास होतो त्यांच्यासाठी कोथिंबीर ही उत्तम औषधी वनस्पती आहे. ही पानं स्वयंपाकात सर्वात जास्त वापरली जाणारी औषधी वनस्पती आहेत. कोथिंबीरीत एक लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे, ज्यामुळे शरीरातील पाणी आणि मीठ कमी होण्यास मदत होते.

जीरं

प्रत्येकाच्याच स्वयंपाकघरात मसाल्याच्या डब्ब्यात जीरं असतं. आयुर्वेदानुसार जिरं पाचन तंत्राला चालना देते. अ‍ॅसिडिटी आणि अपचन यांसारख्या पोटाच्‍या समस्‍यावर पासून सुटका मिळवण्यासाठी रोज सकाळी भिजवलेल्या जिऱ्याचं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

तुळस

पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदात शतकानुशतके तुळशीचा वापर केला जात आहे.  अभ्यासानुसार  तुळशीच्या पानांचा अर्क गॅस्ट्र्रिटिसने पीडित उंदरांमध्ये जठरासंबंधी जळजळ कमी करण्यास प्रभावी ठरला आहे. अशा स्थितीत पोटात गॅस तयार झाल्यानंतर नियमितपणे तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास गॅस्ट्र्रिटिसची समस्या  कमी होते.

बडीशोप

पोटाच्या समस्यांवर बडीशेप हा एक उत्तम आयुर्वेदिक उपाय आहे. हे केवळ सूजलेल्या स्नायूंना आराम देत नाही तर बद्धकोष्ठता दूर करण्याचा एक चांगला मार्ग आहे. या बियांचा पोट आणि आतड्याच्या स्नायूंवर चांगला परिणाम होतो, जे बद्धकोष्ठता आणि ऍसिड रिफ्लक्समुळे होणारा वायू दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.

शेपू

हिवाळ्यात पोटाशी संबंधित समस्या सतावतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी शेपूच्या पानांचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. हिरव्यागार शेपूच्या पानांमध्ये दाहक-विरोधी प्रभाव असल्याचे दिसून आले आहे ज्यामुळे तुम्हाला आराम वाटतो.

कॅमोमाईल चहा

हा हर्बल चहा जठराच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी उत्तम आहे. ही पाने जठराची सूज कमी करण्यास मदत करतात आणि अल्सरपासून देखील आराम देतात. पचनाची समस्या प्रभावीपणे कमी करण्यासाठी तुम्ही दररोज एक कप गरम कॅमोमाइल चहाचे सेवन करू शकता. यामुळे पचनासंबंधी समस्यांवर आराम मिळेल.

पुदीना

खाल्ल्यानंतर लगेच पोट फुगण्याची तक्रार करणाऱ्यांनी पुदिन्याचे सेवन करावे. ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती पोटात जास्त प्रमाणात गॅस तयार होण्यावर नियंत्रण ठेवते.  पेपरमिंट ऑइलमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल कंपाऊंड असतात, जे तुम्हाला गॅस्ट्र्रिटिसच्या लक्षणांपासून आराम देण्यास मदत करतात.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य