स्ट्रोकची गंभीर स्थिती अशावेळी उद्भवते जेव्हा मेंदूपर्यंत रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. हा एक न्युरोलोजिकल प्रोब्लेम आहे. याला ब्रेन अटॅक असंही म्हटलं जातं. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर मेंदूत रक्त वाहिन्या फाटतात आणि रक्त वाहू लागतं त्यामुळे स्ट्रोकची स्थिती उद्भवते. यामुळे व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. (Blood group type could predict your stroke risk a blood group is at higher risk)
अलिकडेच झालेल्या संशोधनात कोणत्या ब्लड ग्रुपवाल्या लोकांना स्टोकचा धोका जास्त असतो याबाबत माहिती समोर आली आहे. यानुसार सावधगिरी बाळगून लाईफस्टाईल सुधारण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डेलीमेलच्या रिपोर्टनुसार कोणत्याही व्यक्तीच्या ब्लड ग्रुपनुसार स्ट्रोकच्या जोखिमेबद्दल माहिती मिळवता येऊ शकते. अमेरिकन रिसर्चर्सनी अनुवांशिक स्ट्रोक आणि इस्केमिक स्ट्रोक रिसर्चचा रिव्ह्यू दिला आहे.
इस्केमिक स्ट्रोक होतो अशावेळी होतो जेव्हा रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. १० पैकी ९ लोकांना ही समस्या जाणवते. रक्ताच्या गुठळ्या झाल्यास रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. वैज्ञानिकांना दिसून आल की ब्लड ग्रुप ए असलेल्यांमध्ये अन्य ब्लड ग्रुपच्या लोकांपेक्षा स्ट्रोकचा धोका १६ टक्क्यांनी ६० वर्षांच्या आधी जास्त होता. ब्लड ग्रुपबरोबरच लिंग, वजन आणि अन्य कारणांवरही या आजाराची तीव्रता अवलंबून असते.
७ व्हेज पदार्थ देतात नॉनव्हेजपेक्षा जास्त प्रोटीन, राहाल ठणठणीत- प्रोटीनची चिंताच नको
याशिवाय टाईप बी ब्लड ग्रुप असलेल्यांना स्ट्रोकचा धोका जास्त असतो. ब्लड ग्रुप ओ असलेल्यांना हा धोका सर्वात कमी ्सतो. जर्नल न्युरोलॉजीमध्ये पब्लिश केलेल्या अभ्यासानुसार मैरिलँड युनिव्हर्सिटीच्या टिमनं ७ हजार स्ट्रोक पेशंट आणि वेगवेगळ्या रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या ६ लाख लोकांच्या आरोग्याची तपासणी केली. त्यांच्यात वयाआधी स्ट्रोक उद्भवण्याची संभावना १२ टक्के कमी होती. बी आणि एबी ब्लड ग्रुपवर कोणताही प्रभाव जाणवला नाही.
घातक कॉलेस्टेरॉलला शरीराबाहेर फेकतील हे ५ पदार्थ, तब्येत कायम राहील ठणठणीत, फिट
रिसर्चचे को-इन्वेस्टिगर आणि न्यूरोलॉजीचे प्रोफेसर डॉ. स्टीवन किटनर (Dr. Steven Kittner) यांच्यामते सुरूवातीला स्ट्रोकच्या लक्षणांकडे लक्ष दिल्यास गंभीर आजाराचा धोका टळू शकतो. ओ पॉझिटिव्ह - ३८ टक्के, ओ निगेटिव्ह - ७ टक्के, ए पॉजिटिव्ह- ३४ टक्के आणि ए निगेटिव्ह- ६ टक्के, बी पॉझिटिव्ह ९ टक्के आण बी निगेटिव्ह २ टक्के, एबी पॉझिटिव्ह ३ टक्के, एबी निगेटिव्ह रक्तगटात १ टक्का स्ट्रोकचा धोका असतो.