बदलत्या जीवनशैलीत रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे कठीण झालं आहे. ऐन तारूण्यातही लोकांना हाय बीपीचा त्रास जाणवत आहे. जेवणाच्या वेळा चुकवणं, बैठी जीवनशैली, सतत बाहेरचं खाणं, शारीरीक हालचालींचा अभाव या कारणांमुळे हे आजार वाढत आहेत. रक्तदाब वाढला तर हृदयालाही धोका असतो हे सर्वांनाच माहीत आहे. (Blood pressure problem in men and women know for stop heart attack)
अशा परिस्थितीत हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू नयेत म्हणून बीपी संतुलित ठेवणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बीपीच्या गोळ्या घेणं टाळणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया वयानुसार महिला आणि पुरुषांचा रक्तदाब कसा असावा. (What is a normal blood pressure by age?)
पुरूषांना हाय ब्लड प्रेशरचा धोका जास्त
महिलांच्या तुलनेत पुरुषांना उच्च रक्तदाबाची समस्या जास्त असते. जेव्हा एखाद्याला चक्कर येते तेव्हा ते कमी रक्तदाबाचे लक्षण असू शकते. याशिवाय कोणत्याही व्यक्तीच्या छातीत दुखणे हे उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते.
पुरूषांमध्ये ब्लड प्रेशर किती असायला हवं (What is a normal blood pressure for men?)
रिपोर्ट्सनुसार, वयोमानानुसार रक्तदाबात बदल होत असतो. पुरुषांमधील वयानुसार, रक्तदाब 120 ते 143 पर्यंत पोहोचू शकतो. वयाच्या 21 ते 25 व्या वर्षी, SBP 120.5 मि.मी. त्याच वेळी, 25 वर्षांनंतर, 50 वर्षांनी रक्तदाब 115 पर्यंत असावा. याशिवाय ५६ ते ६१ पर्यंत रक्तदाब 143 पर्यंत असावा.
महिलांमध्ये किती असायला हवं (What is a normal blood pressure for women?)
वयाच्या 21 ते 25 मध्ये, एसबीपी 115.5 मिमी असावा, तर 26 ते 50 वयात, बीपी 124 पर्यंत पोहोचते. याशिवाय 51 ते 61 वर्षांपर्यंत बीपी 130 पर्यंत असावा.