Join us   

शुगर सतत कमी जास्त होते कारण हमखास होणाऱ्या ५ चुका, वेळीच बदला कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2023 5:32 PM

Blood sugar levels can fluctuate for many reasons ब्लड - शुगरमधील चढ - उतारामुळे त्रस्त आहात? ही समस्या कशी कंट्रोल करता येईल?

डायबिटिज हा आजार सध्या अनेकांना होताना दिसून येत आहे. डायबिटिज होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यात मुख्य कारण म्हणजे खराब जीवनशैली व वेळेवर अन्नाचे सेवन न करणे हे आहे. अधिकतर लोकं फास्ट फूड, जंक फूड, पॅक्ड फूड या पदार्थांच्या आहारी जात आहे. जे आरोग्यासाठी घातक ठरत आहे. ज्यामुळे अनेकांना ब्लड प्रेशर, डायबिटिज, हृदयाच्या संबंधित आजार, अशा प्रकारचे आजार उद्भवत आहे. काही लोकांच्या ब्लड शुगरमध्ये चढ - उतार होत असते. डायबिटिज रुग्णांना रोजची औषधं घ्यावे लागतात. तरी देखील त्यांच्या शुगर लेवलमध्ये का बदल घडते?

यासंदर्भात, न्यूज १८ या वेबसाईटला माहिती देताना मधुमेह तज्ज्ञ आणि सल्लागार एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. पारस अग्रवाल सांगतात, ''मधुमेहाच्या रुग्णांमध्ये औषधे घेतल्यानंतरही रक्तातील साखरेच्या पातळीत बदल होते. त्यांच्या ब्लड शुगरमध्ये खूप चढ-उतार होत असेल तर, त्यामागे अनेक कारणे असू शकतात''(Blood sugar levels can fluctuate for many reasons).

औषधाच्या वेळेत चुका

डॉक्टरांच्या मते, ''अनेक वेळा मधुमेहाचे रुग्ण योग्य वेळी औषधे घेत नाहीत. त्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत चढ - उतार होते. काही लोकं जेवणापूर्वी दिलेली औषधे जेवणानंतर घेतात, तर काही लोकं जेवणानंतरची औषधे जेवणापूर्वी घेतात. या कारणांमुळे रक्तातील साखरेच्या पातळी वाढ होते.''

दैनंदिन दिनचर्यामध्ये बदल

रुग्ण जेव्हा त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत अचानक बदल करतात, तेव्हा रक्तातील साखरेच्या पातळीत देखील झपाट्याने बदल होते. उदाहरणार्थ, एक दिवस खूप व्यायाम करणे, दुसऱ्या दिवशी व्यायाम न करणे. कधी खूप जास्त खाणे, तर कधी कमी खाणे. या कारणांमुळे रक्तातील साखरेच्या पातळीत चढ - उतार होते.

अती लसूण खाण्याचे ३ दुष्परिणाम, आवडतो म्हणून जास्त लसूण खाणेही बरे नाही कारण...

ताणतणाव घेणे

स्ट्रेसमुळे अनेकदा आरोग्यात देखील बदल घडते. आपण कितीही वेळेवर औषधे घेतली किंवा लाईफस्टाईलला फॉलो केलं, जर आपण जास्त ताण घेत असाल, तर रक्तातील साखरेच्या पातळीत सतत चढ-उतार होणार.

इतर आजार

काही आजारांच्या स्थितीत रक्तातील साखरेच्या पातळीत बदल होते. उदाहरणार्थ, पोट खराब, ताप, किंवा इतर काही आजार असतील तर रक्तातील साखरेची पातळी वर-खाली होणे स्वाभाविक आहे.

श्वास घेता येत नाही, सतत धाप लागते? नियमित खा ६ गोष्टी, अस्थमा असेल तर मिळेल आराम

कमी झोप

मधुमेहाच्या रुग्णांनी कमी झोप घेतली तरी, देखील रक्तातील साखर खूप वेगाने वाढते.

कंट्रोल करण्यासाठी टिप्स

अशा परिस्थितीत डॉक्टरांशी संपर्क साधा. डॉक्टरांकडून आपले दिनचर्य प्लॅन तयार करून घ्या. यासोबतच योग्य वेळी खा, योग्य वेळी व्यायाम करा, योग्य वेळी नाश्ता करा. यासह सांगितलेली औषधे वेळेवर घ्या. नियमित व्यायाम, योग, ध्यान यांचा आधार घ्या. मोबाईलवर कमी वेळ घालवा, व पुरेशी झोप घ्या.

टॅग्स : हेल्थ टिप्समधुमेह