Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आता एक ब्लड टेस्ट करुनही होऊ शकते ब्रेस्ट कॅन्सरचे निदान, महिलांसाठी दिलासादायक बातमी

आता एक ब्लड टेस्ट करुनही होऊ शकते ब्रेस्ट कॅन्सरचे निदान, महिलांसाठी दिलासादायक बातमी

Blood Test to Detect Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सरचे निदान होणार सोपे, गंभीर आजारापासून वाचण्यासाठी सोप्या चाचणीचा लागला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 12:44 PM2022-06-23T12:44:57+5:302022-06-23T13:16:26+5:30

Blood Test to Detect Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सरचे निदान होणार सोपे, गंभीर आजारापासून वाचण्यासाठी सोप्या चाचणीचा लागला शोध

Blood Test to Detect Breast Cancer: Breast Cancer Can Be Diagnosed With A Blood Test Now, Good News For Women | आता एक ब्लड टेस्ट करुनही होऊ शकते ब्रेस्ट कॅन्सरचे निदान, महिलांसाठी दिलासादायक बातमी

आता एक ब्लड टेस्ट करुनही होऊ शकते ब्रेस्ट कॅन्सरचे निदान, महिलांसाठी दिलासादायक बातमी

Highlightsयुएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने मान्यता दिलेल्या या टेस्टची किंमत आता भारतात ६ हजार रुपये आहे. या चाचणीचा निकाल मिळण्यासाठी १२ दिवसांचा कालावधी लागतो

महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारा ब्रेस्ट कॅन्सर हा आजार आजही धडकी भरवणारा आहे. गेल्या काही वर्षात जगभरात या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असताना भारतही त्यात मागे नाही. अनेकदा या आजाराचे निदान शेवटच्या टप्प्यात होत असल्याने उपचारांना पुरेसा वेळ मिळत नाही आणि व्यक्तीला आपला जीव गमवावा लागू शकतो. मात्र आता रक्ताद्वारे ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी करता येणार आहे. भारतात नुकतीच ही चाचणी उपलब्ध झाली असून त्यामुळे या गंभीर आजाराचे निदान करणे आता काही प्रमाणात सोपे होणार आहे. महिलांसाठी हे संशोधन दिलासादायक असून जास्तीत जास्त महिलांनी ही चाचणी योग्यवेळी करुन घेतल्यास गंभीर आजारापासून त्यांचे संरक्षण होऊ शकते असे म्हटले जात आहे (Blood Test to Detect Breast Cancer). 

(Image : Google)
(Image : Google)

४० वर्षांवरील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे निदान करण्यासाठी ही रक्ताची चाचणी उपयुक्त ठरणार आहे. युरोपसह जगभरातील १५ देशांमध्ये या चाचणीचा वापर केला जातो. कॅन्सरवरील उपचार खर्चिक आणि वेदनादायी असतात. या त्रासातून जाणारी व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आपली मानसिक, शारीरिक, आर्थिक स्थिती सांभाळणे हे मोठे आव्हान असते. मात्र या आजाराचे वेळीच निदान झाले तर बराच त्रास वाचू शकतो, त्यादृष्टीने ही चाचणी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. सुरूवातीच्या टप्प्यातच या आजाराचे निदान झाले तर लवकर उपचार सुरू करू जीवनकाळ वाढवता येऊ शकतो. ही ब्लड टेस्ट आजाराचे लवकर निदान व्हावे यासाठी असली तरी ती मॅमोग्राफी आणि एमआरआय या पारंपरिक चाचण्यांना पर्याय नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

(Image : Google)
(Image : Google)

दातार कॅन्सर जेनेटीक्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रंजन दातार म्हणाले, ज्यांना ३ आणि ४ टप्प्यातील ब्रेस्ट कॅन्सर आहे त्यांच्यासाठी ही टेस्ट १०० टक्के रिझल्ट देते, दुसऱ्या टप्प्यातील ब्रेस्ट कॅन्सर असणाऱ्यांना ९० टक्के आणि पहिल्या टप्प्यातील कॅन्सर असलेल्या महिलांमध्ये ८० टक्के रिझल्ट देते. अमेरिका आणि लंडनमध्ये याच्या वैद्यकीय चाचण्या झाल्या असून भारतात या चाचणीचा निकाल मिळण्यासाठी १२ दिवसांचा कालावधी लागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दातार कॅन्सर जेनेटीक्स यांनी या चाचणीसाठी अपोलो हॉस्पिटलशी टायअप केले असून ही सुविधा सध्या देशभरातील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. युएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने मान्यता दिलेल्या या टेस्टची किंमत आता भारतात ६ हजार रुपये आहे. 

Web Title: Blood Test to Detect Breast Cancer: Breast Cancer Can Be Diagnosed With A Blood Test Now, Good News For Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.