Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > गणपती मिरवणुकीत नाचून पाय आणि अंग दुखतंय? 3 सोपे उपाय...अंग होईल मोकळं...

गणपती मिरवणुकीत नाचून पाय आणि अंग दुखतंय? 3 सोपे उपाय...अंग होईल मोकळं...

Body and leg Pain Solutions Ganpati immersion Process : दुखणारे शरीर आणि पाय़ मोकळे करण्यासाठी कोणते उपाय करता येतील याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2022 11:32 AM2022-09-11T11:32:54+5:302022-09-11T11:44:18+5:30

Body and leg Pain Solutions Ganpati immersion Process : दुखणारे शरीर आणि पाय़ मोकळे करण्यासाठी कोणते उपाय करता येतील याविषयी...

Body and leg Pain Solutions Ganpati immersion Process : Are your feet and limbs hurting after dancing in the Ganpati procession? 3 simple solutions...the limb will be free... | गणपती मिरवणुकीत नाचून पाय आणि अंग दुखतंय? 3 सोपे उपाय...अंग होईल मोकळं...

गणपती मिरवणुकीत नाचून पाय आणि अंग दुखतंय? 3 सोपे उपाय...अंग होईल मोकळं...

Highlights घरच्या घरी काही सोपे स्ट्रेचिंगचे प्रकार केल्यास त्याचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. हल्ली घरी येऊन छान मसाज करुन देणारेही अनेक असतात. त्याचा अंग मोकळं होण्यासाठी नक्कीच फायदा होतो.

यंदा तब्बल २ वर्षांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत असल्याने राज्यभरात अतिशय उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गणपतीच्या १० दिवसांसोबतच पुण्या-मुंबईतील विसर्जन मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. पुण्यात तर विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत गणेश मंडळे आणि कार्यकर्ते यांच्यातील उत्साह कायम होता. गणेशोत्सव म्हणजे तमाम गणेशभक्तांसाठी अतिशय उत्साहाचा सोहळा असल्याने या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रत्येकाच्याच अंगात एकप्रकारची ऊर्जा संचारते. बाप्पाला निरोप देताना आपण एकीकडे काहीसे भावूक तर होतोच. पण या बाप्पाला वाजत-गाजत निरोप देऊन पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन आपण करतो. या मिरवणूकीत आपण भान विसरुन नाचतो. त्यावेळी ढोलच्या किंवा डीजेच्या तालावर नाचताना आपल्यातला उत्साह ओसंडून वाहत असतो. पण नंतर घरी जाऊन आपण पार आडवे होतो. तेव्हा आपल्या शरीराचा कोणता कोणता भाग दुखतो आहे हे आपल्याला समजते. इतकेच नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर आपले शरीर पूर्ण पॅक झालेले असते. अशावेळी दुखणारे शरीर आणि पाय़ मोकळे करण्यासाठी कोणते उपाय करता येतील याविषयी (Body and leg Pain Solutions Ganpati immersion Process)...

(Image : Google)
(Image : Google)

१. गरम पाणी आणि मीठाचा शेक

नाचून किंवा सलग खूप चालून पायात गोळे आले असतील आणि पाय खूप दुखत असतील तर बादलीत गरम पाणी घेऊन त्यात मीठ घालावे. या पाण्यात पाय बुडवून बसावे. यामुळे पायाच्या नसांना आराम मिळण्या, मदत होते. पायावर आपल्या संपूर्ण शरीराचा भार येत असल्याने नाचून किंवा चालून पाय आखडतात, अशावेळी गरम पाणी आणि मीठामुळे चांगलाच आराम मिळू शकतो. 

२. तेलाने मसाज

नाचून किंवा सतत उभे राहून पाय आणि पाठ जास्तच दुखत असेल तर कोमट तेलाने शरीराला मसााज करणे फायदेशीर ठरते. यामुळे अवघडलेल्या शीरा मोकळ्या होण्यास मदत होते. एरवी आपल्याला चालण्याची किंवा इतका वेळ उभे राहण्याची सवय नसते. तसेच नाचल्यामुळेही शरीराचा खूप व्यायाम होतो. अशावेळी तेलाने मसाज केल्यास नक्कीच आराम मिळू शकतो. आपल्या हातानेही हा मसाज करता येतो किंवा घरातील कोणाकडून मसाज करुन घेऊ शकतो. नाहीच तर हल्ली घरी येऊन छान मसाज करुन देणारेही अनेक असतात. त्याचा अंग मोकळं होण्यासाठी नक्कीच फायदा होतो.

(Image : Google)
(Image : Google)

३. स्ट्रेचिंग 

शरीराला जास्तीचे कष्ट पडल्याने ते बरेच आखडले जाते किंवा दुखते. अशावेळी घरच्या घरी काही सोपे स्ट्रेचिंगचे प्रकार केल्यास त्याचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. यामुळे आखडलेले स्नायू मोकळे होतात. हे स्ट्रेचिंगेच प्रकार आपल्याला ऑनलाइनही मिळू शकतात. 

Web Title: Body and leg Pain Solutions Ganpati immersion Process : Are your feet and limbs hurting after dancing in the Ganpati procession? 3 simple solutions...the limb will be free...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.