Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > 4 लक्षणं दिसताच करा बॉडी डिटाॅक्स, शरीर संकेत देते ते वेळीच ओळखा, कारण..

4 लक्षणं दिसताच करा बॉडी डिटाॅक्स, शरीर संकेत देते ते वेळीच ओळखा, कारण..

बाॅडी डिटाॅक्स ( body detox) करण्याची गरज आहे हे कसं ओळखावं हेच अनेकांना समजत नाही. पण तज्ज्ञ सांगतात की शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी निगडित काही समस्यांवरुन बाॅडी डिटाॅक्सची गरज आहे (symptoms of body detox) हे ओळखता येतं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2022 06:14 PM2022-06-18T18:14:58+5:302022-06-18T18:18:34+5:30

बाॅडी डिटाॅक्स ( body detox) करण्याची गरज आहे हे कसं ओळखावं हेच अनेकांना समजत नाही. पण तज्ज्ञ सांगतात की शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी निगडित काही समस्यांवरुन बाॅडी डिटाॅक्सची गरज आहे (symptoms of body detox) हे ओळखता येतं.

Body shows 4 symptoms for body detox. Toxins effects on physical and mental health | 4 लक्षणं दिसताच करा बॉडी डिटाॅक्स, शरीर संकेत देते ते वेळीच ओळखा, कारण..

4 लक्षणं दिसताच करा बॉडी डिटाॅक्स, शरीर संकेत देते ते वेळीच ओळखा, कारण..

Highlightsआपलं शरीर रोज विविध रासायनिक घटक, प्रदूषण या घटकांशी लढतं. त्याचप्रमाणे खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळेही शरीरात विषारी घटक जमा होतात. या विषारी घटकांमुळे विविध आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. 


स्वत:ची काळजी घेताना बाॅडी डिटाॅक्स करणं ही महत्वाची बाब ठरते. बाॅडी डिटाॅक्स केल्यामुळे चयापचयावर चांगला परिणाम होतो आणि त्याचा परिणाम वजन कमी होण्यावर होतो.  पण म्हणून बाॅडी डिटाॅक्स ( body detox) हे केवळ वजन कमी करण्यासाठीच महत्वाचं असतं असं नाही. आपलं शरीर रोज विविध रासायनिक घटक, प्रदूषण या घटकांशी लढतं. त्याचप्रमाणे खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळेही शरीरात विषारी घटक जमा होतात. शरीरात साचणाऱ्या विषारी घटकांचा परिणाम केवळ वजन वाढण्यावरच होतो असं नाही तर मेंदूच्या कार्यावर, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही (toxins effects on health)  त्याचा परिणाम होतो. यामुळे नियमित बाॅडी डिटाॅक्स करणं आवश्यक आहे. पण बाॅडी डिटाॅक्स करण्याची गरज आहे हे कसं ओळखावं हेच अनेकांना समजत नाही. पण तज्ज्ञ सांगतात की शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी निगडित काही समस्यांवरुन ( symptoms of body detox) बाॅडी डिटाॅक्सची गरज आहे हे ओळखता येतं. 

Image: Google

1. जर वारंवार पचनाशी निगडित समस्या निर्माण होत असतील तर शरीरात विषारी घटकांचा साठा जास्त झाला आहे असं समजावं. शरीरात विषारी घटक जास्त झाल्यास पोटातील आतड्यांना सूज येणं, बध्दकोष्ठता होणं, पोटात सतत गॅसेस धरणं हे त्रास होतात. हे त्रास सतत होत असल्यास बाॅडी डिटाॅक्स करण्याची गरज आहे हे ओळखावं.

2. काम केल्यानंतर शरीराला थकवा येणं ही सहज बाब आहे. पण पुरेसा आराम केल्यानंतरही जर थकवा जात नसेल तर याचाच अर्थ काहीतरी गडबड आहे. सतत थकवा जाणवण्यास अनेक कारणं कारणीभूत असतात. त्याप्रमाणे शरीरातील विषाक्त घटक हेही शरीरास थक्वा आणतात. शरीरातील विषारी घटकांचा प्रभाव मेंदूवर होवून थकवा वाटतो. हा थकवा बाॅडी डिटाॅक्सची गरज असल्याचं सांगतो. 

Image: Google

3. शरीरात साठलेल्या विषारी घटकांचा परिणाम हार्मोन्सवरही होतो. थकण्यासोबतच सतत चिडचिड होत असल्यास, सतत मूड बदलत असल्यास  त्यामागे हार्मोन्स असंतुलित होणं हे कारण असतं. शरीरातील हार्मोन्स असंतुलित होण्याला शरीरातील विषारी घटक कारणीभूत असतात. शारीरिक आणि मानसिक स्तरावर थकवा आणि चिडचिड जाणवायला लागल्यास बाॅडी डिटाॅक्सची गरज अवश्य ओळखावी. 

Image: Google

4. मेंदूच्या कार्यावर शरीरात साठलेले विषारी घटक परिणाम करतात. शरीरातील विषारी घटकांमुळे विस्मरणाची समस्या निर्माण होते. कामात मन एकाग्र होत नाही. याचाच अर्थ शरीरातील विषारी घटकांचा परिणाम मेंदूतील कार्यावरही होतो. मेंदूशी निगडित या समस्यांवरुनही बाॅडी डिटाॅक्स करण्याची गरज ओळखता येते. 

Web Title: Body shows 4 symptoms for body detox. Toxins effects on physical and mental health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.