Join us   

ऐन तारुण्यात हाडं ठणकतात म्हणून डॉक्टरची बिलं भरता? फक्त ४ गोष्टी करा, हाडं होतील बळकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2024 5:40 PM

Bone health: Tips to keep your bones healthy : फक्त ४ सवयी बदलल्या तरी आपण हाडांची दुखणी लांब ठेवू शकतो.

संपूर्ण शरीर हाडांच्या सरंचनेवर अवलंबून असते. यामुळे शरीराला योग्य आकार मिळतो (Bone health). हाडांमुळे शरीराला हालचाल करण्यास मदत मिळते (Health tips). शिवाय स्नायूंना आधारही देतात. पण वयानुसार हाडं ठिसूळ होतात. ज्यामुळे हाडांचे दुखणे, सांधेदुखी, कंबरदुखी यांसारखी दुखणी मागे लागतात. हाडांना कॅल्शियम, फॉस्फेट आणि इतर खनिजे लागतात.

जेव्हा शरीराला गरज असते, तेव्हा ते रिलीज करतात. त्यामुळे आहारातून या गोष्टी शरीराला मिळणे गरजेचं आहे. अन्यथा सांधेदुखीपासून ऑस्टिओपोरोसिसपर्यंत सर्वच गोष्टींचा धोका वाढतो. हाडांना मजबूत करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा? पाहूयात(Bone health: Tips to keep your bones healthy).

हाडांना मजबूत करण्यासाठी उपाय

कॅल्शियम

मेयो क्लिनिक या वेबसाईटनुसार, आपली हाडं कॅल्शियमपासून तयार होतात. यामुळे आहारात कॅल्शियम असायलाच हवे. मात्र, कॅल्शियमच्या अभावामुळे बोन डेण्सिटी कमी होऊ शकते. एका व्यक्तीला दिवसभरात १००० मिलीग्राम कॅल्शियमयुक्त आहार खायला हवे. यासाठी दूध, दही, दुग्धजन्य पदार्थांशिवाय बदाम, ब्रोकोली आणि पालेभाज्यांचे सेवन करायला हवे.

पोट साफ - आतडी तंदुरुस्त ठेवायची? करा ४ स्टेप्स, २१ दिवसात वजन घटेल - त्वचाही चमकेल

व्हिटॅमिन डी

शरीरात व्हिटॅमिन डी असल्याशिवाय शरीराला कॅल्शियम मिळत नाही. कारण व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषून घेते. एका व्यक्तीला ६०० ते ८०० इंटरनेशनल यूनिटपर्यंत व्हिटॅमिन डीची गरज असते. व्हिटॅमिन डीचा उत्तम सोर्स सूर्यप्रकाश आहे. शरीर स्वतःच सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी तयार करते. पण यासोबत दूध, धान्य, मशरूम, फोर्टिफाइड फूड इत्यादी पदार्थ खायला हवे.

फिजिकल अॅक्टिव्हिटी

हाडांना मजबुती फक्त आहारातून नसून, शारीरिक अॅक्टिव्हिटीही तितकीच गरजेची आहे. हाडं मजबूत करण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. वॉकिंग, जॉगिंग, पायऱ्या चढणे - उतरणे, इत्यादी अॅक्टिव्हिटी करा. नियमित व्यायाम केल्याने वृद्धापकाळापर्यंत हाडे मजबूत राहतील.

फ्रिजमध्ये ठेवू नका ‘या’ ४ भाज्या, पाहा त्यानं होतं काय, पावसाळ्यात आजारपणाला आमंत्रण

या गोष्टींपासून दूर राहा

अनेक गोष्टी हाडं कमकुवत करतात. जसे की, सिगारेट, अल्कोहोल, प्रोसेस्ड फूड इत्यादी पदार्थ हाडांना ठिसूळ करतात. त्यामुळे शक्यतो या गोष्टींपासून लांब राहा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य