Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हातापायांना सतत मुंग्या; हाडं कडकड वाजतात? रोज खा ५ पैकी १ पदार्थ; दिवसभर राहाल एनर्जेटिक

हातापायांना सतत मुंग्या; हाडं कडकड वाजतात? रोज खा ५ पैकी १ पदार्थ; दिवसभर राहाल एनर्जेटिक

Boost Your Stamina with These 5 Everyday Foods : स्टॅमिना वाढवायचं असेल तर, आजपासूनच हे ५ पदार्थ खा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2024 03:20 PM2024-08-12T15:20:33+5:302024-08-12T15:22:12+5:30

Boost Your Stamina with These 5 Everyday Foods : स्टॅमिना वाढवायचं असेल तर, आजपासूनच हे ५ पदार्थ खा..

Boost Your Stamina with These 5 Everyday Foods | हातापायांना सतत मुंग्या; हाडं कडकड वाजतात? रोज खा ५ पैकी १ पदार्थ; दिवसभर राहाल एनर्जेटिक

हातापायांना सतत मुंग्या; हाडं कडकड वाजतात? रोज खा ५ पैकी १ पदार्थ; दिवसभर राहाल एनर्जेटिक

झोपून उठल्यानंतर सकाळ फ्रेश आणि आनंदमयी जायला हवे (Healthy Foods). पण बऱ्याचदा होतं उलटं. सकाळी उठल्यानंतर काहींना थकल्यासारखं जाणवतं (Stamina Increasing Foods). किंवा संपूर्ण दिवस हा आळसात जातो. ज्यामुळे प्रॉडक्टिव्हिटी कमी होते. आणि अनेक कामे रखडली जातात (Healthy Bones). जर आपल्याला खाऊनही उर्जा मिळत नसेल तर, आहारात पौष्टीक पदार्थांची कमतरता असू शकते.

ज्यामुळे थोडं काम केल्यानंतर आपल्याला थकवा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. बऱ्याचदा अशक्तपणा जाणवल्यानंतर हात पाय देखील सुन्न होतात. शिवाय उठता बसता हाडातून कडकड असा आवाज येऊ लागतो. जर आपल्यालाही कमकुवतपणा जाणवत असेल तर, आजच आहारात ४ पदार्थांचा समावेश करून पाहा(Boost Your Stamina with These 5 Everyday Foods).

मनुका

मनुका खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली होते. यामुळे आपले अनेक आजारांपासून संरक्षण होते. जर शरीरात रक्ताची कमतरता असेल तर, भिजलेले मुठभर मनुके खावा. यामुळे हिमोग्लोबिन वाढते.

शरीरात रक्ताची कमतरता? हाडंही दुखतात? रोज १ खजूर खा; आरोग्याला छळणाऱ्या समस्या सुटतील..

खजूर

शरीर कमकुवत असेल तर, खजूर खा. खजुरामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन आणि मिनरल असतात. यासाठी खजूर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी खा. यामुळे स्टॅमिना देखील वाढतो. आपण साखरऐवजी खजूर खाऊ शकता.

गरीबी फार - खुराकही कमी पण अर्शद नदीम न चुकता खात असे २ गोष्टी, फिटनेस वाढला कारण..

बदाम

बदाम खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात प्रोटीन, अँटी-ऑक्सिडंट्सही असतात. शिवाय कॅलरीचं प्रमाण कमी असतं. ज्यामुळे वजन नियंत्रित राहते. शिवाय फायबरमुळे पोटही दीर्घकाळ भरलेले राहते. ज्यामुळे आपल्याला थकल्यासारखं वाटत नाही.

अंजीर

नियमित अंजीर खाल्ल्यानेही थकवा दूर होऊ शकतो. यामध्ये  व्हिटॅमिन A, B1, B2, C, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, मँगनीज, सोडियम, पोटॅशियम आणि फायबर असते. ज्यामुळे शरीराला पुरेपूर फायदा होतो. शरीर तंदुरुस्त आणि थकवाही दूर होतो.

Web Title: Boost Your Stamina with These 5 Everyday Foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.