जेव्हा पण आपण दुखी होतो, तेव्हा आपण स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करतो. त्यातच आपण स्वतःचा आनंद शोधतो. आणि तो आनंद शब्दात वर्णन करणे कठीण आहे. महिला वर्ग मूड ठीक करण्यासाठी अनेक गोष्टी करतात. कपडे असोत, पुस्तके असोत, मेकअप असो किंवा गॅझेट्स, खरेदी हा त्यांचा आवडता विषय. मात्र, शॉपिंग करणे ही एक थेरपी आहे, ही गोष्ट आपल्याला माहित होती का? शॉपिंग खरेदी करणे याला रिटेल थेरपी असे देखील म्हणतात. ज्याला लोक सामान्य भाषेत शॉपिंग थेरपी देखील म्हणतात. ही थेरपी केल्याने मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
रिटेल थेरपी ही एक प्रकारची 'कम्फर्ट बाईस' मानली जाते. शॉपिंग थेरपी घेतल्याने मेंदूला आरामदायी चालना देते. मानसिक तणाव कमी करण्यासाठी रिटेल थेरपी उपयुक्त आहे. आपला जेव्हा मूड खराब असेल तेव्हा ही थेरपी उपयुक्त ठरेल.
जर्नल ऑफ कंझ्युमर सायकॉलॉजी मधील 2014 च्या अभ्यासात असे निदर्शनास आले की, रिटेल थेरपी लोकांना त्वरित आनंदी बनवते. खरेदीमुळे लोकांना दीर्घकाळच्या दुःखाशी लढण्यास मदत होऊ शकते आणि कोविड नंतरच्या काळात ते अधिक प्रासंगिक बनले आहे.
रिटेल थेरपीचे फायदे
नियंत्रण मिळवण्याचा आत्मविश्वास येतो
रिटेल थेरपीमध्ये शॉपिंग केल्यानंतर व्यक्तीला इतर गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचा आत्मविश्वास मिळतो. परिस्थिती कोणतीही असो, तो सकारात्मक विचार करू लागतो आणि समस्यांमधून बाहेर पडतो.
सकारात्मक प्रभाव दिसतो
आकर्षक वस्तू खरेदी केल्यानंतर, त्यांचा वापर करताना, व्यक्तीला सकारात्मक आणि आकर्षक उर्जा मिळते. त्यामुळे खरेदीचा सकारात्मक परिणाम लगेच दिसू लागतो.
प्लॅनिंग पुर्ण होण्याचा आनंद मिळतो
खरेदी करताना अनेकांना वेळेचं भान नसते. खरेदी करत असतांना प्रत्येक वस्तूंकडे जाऊन पाहण्याचा मोह आवरत नाही. मात्र, खरेदी करताना निश्चित योजनेचे कामही पूर्ण होते. यासह काम पूर्ण होत असल्याचा आनंद देखील मिळतो.
आनंद मिळतो
खरेदी केल्यानंतर, शरीराच्या आणि मेंदूच्या काही भागांना योग्य चालना मिळते. हा आनंद वाढवणारा घटक मानला जातो. याने मनःस्थिती चांगली यासह मन प्रसन्न होते. त्यामुळे मन स्थिती बिघडल्यास शॉपिंग थेरपीचा वापर करून पाहा.