Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > नाश्त्याला नेहमी 'हे' ५ पदार्थ खात असाल तर वाढतो कॅन्सरचा धोका, आजपासूनच बदला सवय

नाश्त्याला नेहमी 'हे' ५ पदार्थ खात असाल तर वाढतो कॅन्सरचा धोका, आजपासूनच बदला सवय

Popular Breakfast Food May Be Increasing Your Cancer Risk, New Study Suggests : नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार ५ ते १० टक्के कॅन्सर जेनेटिक असतो बाकी सर्व कॅन्सर लाईफस्टाईल रिलेडेट आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 05:08 PM2023-08-18T17:08:12+5:302023-08-19T13:09:31+5:30

Popular Breakfast Food May Be Increasing Your Cancer Risk, New Study Suggests : नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार ५ ते १० टक्के कॅन्सर जेनेटिक असतो बाकी सर्व कॅन्सर लाईफस्टाईल रिलेडेट आहेत.

Breakfast foods that cause cancer or diabetes should not consume : Breakfast Food May Be Increasing Your Cancer Risk | नाश्त्याला नेहमी 'हे' ५ पदार्थ खात असाल तर वाढतो कॅन्सरचा धोका, आजपासूनच बदला सवय

नाश्त्याला नेहमी 'हे' ५ पदार्थ खात असाल तर वाढतो कॅन्सरचा धोका, आजपासूनच बदला सवय

कॅन्सर (Cancer) हा एक गंभीर आजार आहे. सुरूवातीला या आजाराबाबत माहिती न मिळाल्यास मृत्यूचा सामना करावा लागू शकतो.  डब्ल्यूएचओनुसार दरवर्षी १ कोटी लोकांना यामुळे मृत्यूचा धोका असतो.  जगभरात ६ पैकी एकचा मृत्यू कॅन्सरने होते. कॅन्सरची अनेक कारणं असू शकतात. (Health Tips) नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार ५ ते १० टक्के कॅन्सर जेनेटिक असतो बाकी सर्व कॅन्सर लाईफस्टाईल रिलेडेट आहेत. (Breakfast foods that cause cancer or diabetes should not consume) आकडेवारीनुसार २५ ते ३० टक्के मृत्यू कॅन्सरसाठी जबाबदार असतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे कॅन्सरसारख्या घातक आजारांचा धोका वाढतो. रोजचा नाश्ता करताना काही चुकीच्या पदार्थांचा समावेश केल्यामुळे  कॅन्सरचा धोका वाढतो. (Best Breakfast Foods for People with Diabetes)

चहा बिस्किट

रोज चहा बरोबर बिस्किट खाणं कॅन्सरचं कारण ठरू शकतं. चहाबरोबर हे पदार्थ  खाल्ल्यानं म्हणजेच अल्ट्रा प्रोसेस  कुकीज खाल्ल्यानं ओव्हेरिन कॅन्सरचा धोका वाढतो. इंपिरियल कॉलेज स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने २ लाख लोकांवर केलेल्या एका अभ्यासात दिसून आलं की नाश्त्याला अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाल्ल्यानं कॅन्सरचा धोका वाढतो. (Ice-cream, bread, breakfast cereal among list of foods that increases cancer risk)

ब्रेड

रोज नाश्त्याला ब्रेड खाणं नुकसानकारक ठरतं. यामुळे ओव्हरीयन कॅन्सरचा धोका वाढतो. वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडने अभ्यासात सांगितले आहे की, आईस्क्रीम, ब्रेकफास्ट सेरिएल्स, हेमबर्गर नियमित खाल्ल्यानं  कॅन्सरचा धोका दुप्पटीने वाढतो.

मायक्रोव्हेव पॉपकॉर्न

मायक्रोव्हेव्ह पॉपकॉर्न अल्ट्रा प्रोसेस्ड फूड आहे. आपण जेव्हा घरी पॉपकॉर्न बनवतो तेव्हा त्यात कोणतेही केमिकल्स मिसळले जात नाहीत. पण बाहेरचे पॉपकॉर्न  अल्ट्रा प्रोसेसिंगने बनवले जातात. यात पीएफओए उत्पादन असते. यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. म्हणून रोजच्या नाश्त्याला पॉपकॉर्न खाणं टाळावे.

बटाट्याचे चिप्स

काहीजण  नाश्त्याला चहाबरोबर बटाट्याचे चिप्स खातात.  पोटॅटो चिप्स आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात. चिप्समध्ये जास्त प्रमाणात सोडियम असते आणि फ्राय करण्यासाठी ट्रांस फॅट्सचा वापर केला जातो. यात सॅच्युरेडेट फॅट्सचे प्रमाण जास्त असते. उच्च तापमानात बनवल्यामुळे यात एक्रीलामाईड कंपाऊंड्स वाढतात. म्हणून सकाळच्या नाश्त्याला चहाबरोबर बटाट्याचे चिप्स खाऊ नये.

प्रोसेस्ड मीट

प्रोसेस्ड मीटपासून बनलेल्या पदार्थांत कार्सनोजेन केमिकल असते ज्यामुळे कॅन्सरचा धोका अनेकपटींनी वाढतो. रेड मीट  अनेक प्रकारच्या क्रोनिक आजारांचे कारण ठरू शकते. म्हणून याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे, जास्त प्रमाणात सेवन करू नका. 

Web Title: Breakfast foods that cause cancer or diabetes should not consume : Breakfast Food May Be Increasing Your Cancer Risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.