जेव्हा काहीजण चालायला जातात किंवा जिना चढतात तेव्हा त्यांना थाप लागल्यासारखं होतं. तुम्हालाही असंच वाटत असेल तर या मागचं कारण समजून घ्यायला हवं आणि आपली चालण्याची पद्धत बदलायला हवी. जेणेकरून तुम्ही सहज श्वास घेऊ शकाल आणि फिरण्याचा आनंदही घेता येईल. (Breathlessness Or Shortness Of Breath Solution) उपाय शोधण्याआधी हे समजून घेणं महत्वाचे आहे की तुम्हाला चालताना दम लागण्याचा त्रास का होत आहे. चुकिची जीवनशैली, अस्थमा यांसारखे आजार, हृदयासंबंधित समस्या यामुळे चालताना दम लागतो. (Breathlessness Or Shortness Of Breath While Walking Immediately Changes These Things)
1) नेहमी हळू-हळू चाला
जेव्हा तुम्ही चालणं सुरू करता तेव्हा सुरूवातीला संथ गतीने चाला. नंतर हळूहळू वेग वाढवा जेणेकरून शरीराचे प्रेशर अचानक वाढणार नाही. आरामात चालण्याची सुरूवात करता. ज्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होणार नाही. हळूहळू आपली चालण्याची वेळ आणि इंटेसिटी वाढवा.
१ महिन्यात ४ किलो वजन कमी करा-आहारतज्ज्ञांनी सांगितलं खास डाएट; मेंटेन राहण्याचं साधं सिक्रेट
2) श्वास घेण्याची पद्धत
श्वास घेण्याची परफेक्ट पद्धत तुमच्या शरीरात बराच बदल करू शकते. डायफ्रामिक ब्रिदिंग करण्याचा अभ्यास करत दीर्घ श्वास घ्या. श्वास घेतल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे श्वास नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि दम लागण्याची समस्या उद्भवत नाही.
3) चालण्याची योग्य पद्धत कोणती
चालताना योग्य मुद्रा ठेवा. यामुळे श्वास घेण्याच्या क्षमतेत सुधारणा होते. तुम्ही पाठ सरळ करून खांदे मागच्या बाजूला ठेवू आणि डोकं वरच्या बाजूला ठेवा फुफ्फुसांवर ताण-तणाव येणार नाही असे पाहा. पोटाच्या मांसपेशी टाईट करण्यास मदत होते आणि फुफ्फुसांचे फंक्शन चांगले राहण्यास मदत होते.
4) जिना चढताना दम लागू नये यासाठी काय करावे?
चालताना सुरूवातीला मध्ये मध्ये ब्रेक घ्या, डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या, कंफर्टेबल रस्त्यावर चाला, फुटवेअर्सकडे दुर्लक्ष करू नका. योग्य साईजचे आरामदायक कपडे घाला. वर्कआऊट रूटीनमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंगचा समावेश करा.