Join us   

छातीत जळजळ-आंबट ढेकर येतात? ताकात 'हा' पदार्थ घालून प्या, ॲसिडिटीवर लगेच आराम मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 8:26 PM

Buttermilk And Chia Seeds To Get Relief : एक्सपर्ट्सच्या मते ताकात चिया सिड्स मिसळून प्यायल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात.

ॲसिडिटीची (Acidity Solution) समस्या ही खूपच सामान्य आहे. ॲसिडिटी अनेक कारणांमुळे  होते. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अन्हेल्दी लाईफस्टाईलमुळे ॲसिडिटी होते. कोणी या उपायासाठी औषधं घेतं तर कोणी घरगुती उपाय करते. एक घरगुती उपाय करून तुम्ही ॲसिडिटीच्या त्रासापासून सुटका मिळवू शकता. लाईफस्टाईल एक्सपर्ट लवनीत बत्रा यांनी इंस्टग्रामवर याबाबत अधिक माहिती शेअर केली आहे. (Buttermilk And Chia Seeds To Get Relief From Acidity)

ॲसिडिटी दूर करण्यासाठी हे ड्रिंक प्या

एक्सपर्ट्सच्या मते ताकात चिया सिड्स मिसळून प्यायल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. एक ग्लास ताकात एक छोटा चमचा चिया सिड्स मिसळून पिऊ शकता. ताकातील लॅक्टीक एसिड पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते.

लॅक्टिक ॲसिड एक नॅच्युरल आम्ल आहे. जे पोटातील अतिरिक्त एसिड संतुलित करते आणि पचनक्रिया चांगली राहते. हे एसिड रिफ्लेक्ससारख्या समस्या कमी करण्यास मदत करते ज्यामुळे पोटाची जळजळ कमी होण्यास  मदत होते.

नाश्ता करणंच बंद केलं तर वजन खरंच पटकन कमी होतं? आहारतज्ज्ञ सांगतात, वेट लॉससाठी हेच योग्य की..

चिया सिड्स ताकात मिसळून प्यायल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. यात फायबर्सचे उच्च प्रमाण असते. ओमेगा फॅटी एसिड आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. पोटातील एसिड वर जाण्यापासून रोखता येते. पोटातील एसिड लिकिंग कमी करण्यास मदत होते.   

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल