Join us   

सांधेदुखी असेल तर कोबी ठरते फायदेशीर, ४ सोपे उपाय - सांधेदुखीचा त्रास होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2023 12:25 PM

Cabbage Leaf Wraps for Arthritic Knees: सांध्यांवर कोबीचे पान लावल्याने सांधेदुखी खरंच थांबते? नक्की खरं काय?

कोबी ही भाजी पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. याची भाजी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यात फोलेट, कॉपर, व्हिटॅमिन बी१, मॅंगनीज, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, फायबर आणि व्हिटॅमिन के आढळते. कोबीमध्ये कमी कॅलरीज असतात. कोबी खाल्ल्याने वजन तर कमी होतेच, पण कोबीच्या पानांचा वापर करून संधिवाताची समस्या नियंत्रित करता येऊ शकते.

आता तुम्ही म्हणाल कोबीचा वापर फक्त विविध पदार्थ करण्यासाठी, यामुळे संधीवात कसा कमी होईल? तर हो, यामुळे खरंच फरक पडतो. कोबीचे पान सांध्यांवर मलमपट्टीप्रमाणे लावल्यास वेदनांपासून बराच आराम मिळतो. पण कोबीच्या पानांचा वापर नेमका कसा करावा पाहूयात(Cabbage Leaf Wraps for Arthritic Knees: A Natural Remedy for Joint Pain).

पहिली ट्रिक

ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, सर्वप्रथम, कोबीची मोठी पानं घ्या. व ही पानं प्लास्टिकच्या पिशवीत ठेऊन फ्रिजरमध्ये ठेवा. सांधेदुखीचा त्रास सुरू झाल्यास कोबीची पानं प्रभावित भागावर लावा. त्यानंतर टॉवेल घेऊन कोबीवर गुंडाळा. असे केल्याने थंड पानं शरीराच्या उष्णतेने उबदार होतील. या प्रक्रियेत, कोबीमध्ये असलेले घटक त्वचेत प्रवेश करतील. व यूरिक ऍसिडमध्ये विरघळू लागतील. ज्यामुळे यूरिक ऍसिडचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे संधीवाताचा त्रास कमी होईल.

दर १० पैकी ६ टीनएज मुलींना आहे ॲनिमियाचा त्रास, वयात येतानाच ॲनिमिया झाला तर, डॉक्टर सांगतात..

दुसरी ट्रिक

जर आपल्या तळव्यांना सूज आली असेल तर, कोबीच्या पानांचा वापर करा. यासाठी कोबीची पाने प्रभावित भागावर लावा. त्यावर प्लास्टिक गुंडाळा. पाय वरील दिशेकडे उंच करून ठेवा. ३० मिनिटानंतर प्लास्टिक काढा. यामुळे तळव्यांना आलेली सूज कमी होईल.

तिसरी ट्रिक

कोबीची काही पानं घ्या. लाटण्याने पानं सपाट करा. असे केल्याने पानांना भेगा पडतील व त्यातून रस बाहेर पडू लागेल. व लाटलेलं पान पायाभोवती गुंडाळा आणि कापडाने बांधा. असे केल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होईल.

मासिक पाळीच्या चार दिवसात अपचनाचा त्रास होतो, पोट बिघडते? डॉक्टर सांगतात कारणं आणि उपाय..

चौथी ट्रिक

सर्वप्रथम, फ्राईंग पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यावर कोबीची पानं घालून गरम करा. मात्र, पानं जास्त गरम करू नये. त्यानंतर ही पानं पायांवर लावून गुंडाळा. ४५ मिनिटानंतर पानं काढा. यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळेल.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य