Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कॅल्शियमची कमतरतेने नखं आणि हाडं ठिसूळ होतात, ५ पदार्थ खा-भरपूर कॅल्शियम मिळेल

कॅल्शियमची कमतरतेने नखं आणि हाडं ठिसूळ होतात, ५ पदार्थ खा-भरपूर कॅल्शियम मिळेल

Calcium Deficiency You Can See In Nails : कॅल्शियम हा हाडं आणि दातांच्या मजबूतीसाठी आवश्यक असलेला घटक आहे ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका टाळता येतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 10:44 AM2024-08-22T10:44:23+5:302024-08-22T17:30:43+5:30

Calcium Deficiency You Can See In Nails : कॅल्शियम हा हाडं आणि दातांच्या मजबूतीसाठी आवश्यक असलेला घटक आहे ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका टाळता येतो.

Calcium Deficiency You Can See In Nails 5 Calcium Rich Foods For Strong Bones | कॅल्शियमची कमतरतेने नखं आणि हाडं ठिसूळ होतात, ५ पदार्थ खा-भरपूर कॅल्शियम मिळेल

कॅल्शियमची कमतरतेने नखं आणि हाडं ठिसूळ होतात, ५ पदार्थ खा-भरपूर कॅल्शियम मिळेल

कॅल्शियमची कमतरता भासल्यास शरीरात अनेक लक्षणं दिसून येतात जसं की कंबर, पाय, कुल्ह्यांमध्ये वेदना होतात, मांसपेशी कमकुवत होतात, दात कमकुवत होता, कॅव्हिटीजी आणि हिरड्यांच्या समस्याही उद्भवतात. नखं पातळ होतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीर थकल्यासारखं वाटतं. (Calcium Deficiency You Can See In Nails)

कॅल्शियम हा हाडं आणि दातांच्या मजबूतीसाठी आवश्यक असलेला घटक आहे ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका टाळता येतो. कॅल्शियम मांसपेशींचे संकुचन होण्यात  महत्वाची भूमिका बजावतो. कॅल्शियममुळे रक्ताच्या गुठळ्याही तयार होत नाहीत. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होतात याव्यतिरिक्त नखांमध्येही लक्षणं दिसून येतात. (Calcium Deficiency You Can See In Nails 5 Calcium Rich Foods For Strong Bones)

कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणं

वॉशिग्टन नॅशनल हेल्थ सर्विसच्या रिपोर्टनुसार कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अनेक लक्षणं  दिसून येतात जसं की कंबरेत वेदना, मांसपेशी कुमकुवत होणं, दातांमध्ये वेदना, चिंताग्रस्तता हिरड्यांच्या समस्या, नखं पातळ होणं कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीराला थकवा येतो.  (Ref) जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता भासते तेव्हा नखं पातळ होतात आणि तुटू लागतात. हाडांतून कॅल्शियम कमी होणे याला ऑस्टिओपेनिया असं म्हणतात. जेव्हा ते सौम्य असते तेव्हा या स्थितीला ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतात.

नखं आणि हाडं वेगवेगळ्या गोष्टींपासून बनले असले तरी बऱ्याचप्रमाणात एकसारखेच असतात. यासाठीच नखं खराब होणं हे हाडांच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे. कॅल्शियमच्या कमतरतेनं नखांची वाढ कमी होते फक्त कॅल्शियमच नाही तर शरीरात इतर पोषक तत्वांची कमतरता असल्यासही नखांची वाढ कमी वेगानं होते. कॅल्शियमयुक्त दूध, दही, पनीर, हिरव्या भाज्या, सोयाबीन, बदाम, संत्री या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा. 

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी काय खावं?

फोर्टिफाईड सोया आणि राईस ड्रिंक्स, फोर्टिफाईड ज्यूस आणि माशांमध्ये देखिल कॅल्शियम असते.  द्रव पावडर, गोळ्या कॅप्सूलच्या माध्यमातून तुम्हाला पुरेसे कॅल्शियम मिळू शकते. आपल्या शरीरात कॅल्शियम कमी आहे ते अनेकांना माहिती नसते. तुमच्या शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळत आहे का हे पाण्यासाठी तुम्ही हाडांची घनता चाचणी करू शकता. 

Web Title: Calcium Deficiency You Can See In Nails 5 Calcium Rich Foods For Strong Bones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.